संग्राम थोपटेंचा मंगळवारी भाजप प्रवेश; काँग्रेसमध्ये डावलले जात असल्याचा आरोप

काँग्रेसचे नेते तथा भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सभासदत्वाचा राजीनामा दिला असून रविवारी कार्यकर्त्यांसोबत बेठक घेऊन त्यांनी आपली पुढील भूमिका स्पष्ट केली.
संग्राम थोपटेंचा मंगळवारी भाजप प्रवेश; काँग्रेसमध्ये डावलले जात असल्याचा आरोप
Published on

मुंबई : काँग्रेसचे नेते तथा भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सभासदत्वाचा राजीनामा दिला असून रविवारी कार्यकर्त्यांसोबत बेठक घेऊन त्यांनी आपली पुढील भूमिका स्पष्ट केली. संग्राम थोपटे हे येत्या २२ एप्रिल रोजी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

“काँग्रेस पक्षात अनेक वर्षांपासून मी आणि माझ्या वडिलांनी काम केले आहे. मात्र, काँग्रेसमध्ये मला अनेकदा डावलण्यात आले. त्यामुळे दुःख वाटत आहे. तालुक्याच्या विकासासाठी, तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे,” असे संग्राम थोपटे यांनी सांगितले. “मी कोणाच्याही दबावाला कधीही बळी पडलो नाही. भोर तालुक्यात लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे काम आम्ही प्रामाणिकपणे केले होते. जे केले ते सांगायला काही हरकत नाही. इतरही अनेक जबाबदारी मला पक्षाने दिली. त्या सर्व जबाबदाऱ्या आपण पार पाडल्या,” असेही त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in