"2024 च्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला फोडून काढू", युवा संघर्ष यात्रेच्या समारोप सभेत राऊतांचा हल्लाबोल

महाराष्ट्राला मध्य प्रदेशची हवा लागू देणार नाही, असं देखील राऊत म्हणाले.
"2024 च्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला फोडून काढू", युवा संघर्ष यात्रेच्या समारोप सभेत राऊतांचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वातील युवा संघर्ष यात्रेच्या नागपूर येथे झालेल्या समारोप सभेत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जहरी टीका केली. पंतप्रधान मोदी देशभर गॅरंटी देत आहेत. मात्र, आजची सभा महाराष्ट्रात विजयाची गॅरंटी देणारी आहे, देशाची वाट लावणाऱ्यांसाठी ही सभा इशारा आहे. महाराष्ट्र हा झुकणार नाही. आमचे आमदार फोडता,आम्ही तुम्हाला २०२४ च्या निवडणुकीत फोडून काढू, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा आज नागपुरात समारोप झाला. या समारोप सभेत राऊत आपल्या खास आक्रमक शैलीत सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले. पवार म्हणाले की, ही लढणाऱ्यांची आणि संघर्ष करणाऱ्यांची सभा आहे. पळपुट्यांची सभा नाही. आम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आणू, महाराष्ट्राला मध्य प्रदेशची हवा लागू देणार नाही, असं राऊत म्हणाले.

आजची सभा मोदींना गॅरंटी देतेय की, २०२४ मध्ये तुम्ही सत्तेत नसाल आणि फडणवीस तुम्हीही सत्तेत नसाल. अनिल देशमुख हे जेलमधील मित्र आहेत. संघर्ष करणाऱ्यांची मैत्री पक्की आहे, असं म्हणत आम्ही झुकलो नाहीत, असंही राऊत म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in