पंतप्रधान होण्याच्या स्वप्नामुळे देवेंद्र फडणवीस राज्यात उपमुख्यमंत्री - संजय राऊत

आदित्य ठाकरेला तयार करून अडीच वर्षानंतर त्याला मुख्यमंत्री करणार आणि मी दिल्लीत जाणार, असे देवेंद्र फडणवीस यांना वाटू लागल्याचा खुलासा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका प्रचार सभेत केला आहे.
पंतप्रधान होण्याच्या स्वप्नामुळे देवेंद्र फडणवीस राज्यात उपमुख्यमंत्री - संजय राऊत

मुंबई : 'देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न मोदी आणि शहांना आवडले नाही. त्यामुळे फडणवीस यांना राज्यात उपमुख्यमंत्री करत एकनाथ शिंदे यारख्या ज्युनिअर नेत्याच्या हाताखाली काम करायला लावे, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली. आदित्य ठाकरेला तयार करून अडीच वर्षानंतर त्याला मुख्यमंत्री करणार आणि मी दिल्लीत जाणार, असे देवेंद्र फडणवीस यांना वाटू लागल्याचा खुलासा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका प्रचार सभेत केला आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले.

आदित्य ठाकरेला तयार करून, अडीच वर्षानंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आणि आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री बनवणार, असा खुलासा उद्धव ठाकरेंनी केला, यावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, "हे सत्य आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना पंतप्रधान होण्याचे स्वप्न पडू लागले होते की, मी देशाचा पंतप्रधान होणार आणि मोदींच्या जागेवर जाणार. फडणवीसांचे असेही स्वप्न होते की, मी केंद्रात गृहमंत्री होणार आहे. त्यामुळे फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनविले ना. मी पंतप्रधान होणार, मी आता ऐवढा मोठा झालो आहे की, योगी आणि मोदी यांना मागे टाकून मी पंतप्रधान होणार आहे, असे फडणवीस यांच्या डोक्यात सुरू होते. उद्धव ठाकरेंनी सांगितले ते सर्व खरेच आहे. आमचे राजकारण हे खोटेपणावर सुरू नाही.

...ज्युनिअर नेत्यांच्या हाताखाली काम करायला लावले

सलीम-जावेद स्क्रिप्ट घेऊन काही नेते दररोज येत आहेत. त्यांना योग्य वेळी उत्तर देऊ, असे फडणवीस म्हणाले. या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, "उद्धव ठकारेंनी दिलेले उत्तर हे बरोबर आहे. त्यावेळी फडणवीस यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्री होण्याचे स्वप्न पडत होते. परंतु, देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न मोदी आणि शहांना आवडले नाही. त्यामुळे फडणवीस यांना राज्यात उपमुख्यमंत्री करत एकनाथ शिंदे यारख्या ज्युनिअर नेत्यांच्या हाताखाली काम करायला लावले. याला मोदी-शहांचे राजकारण म्हणतात."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in