...तर बावनकुळे उत्तराधिकारी : संजय राऊत

संसदेचे पावसाळी अधिवेशन लवकरच सुरू होत आहे. त्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल किंवा विस्तार होण्याची शक्यता आहे.
...तर बावनकुळे उत्तराधिकारी : संजय राऊत
...तर बावनकुळे उत्तराधिकारी : संजय राऊत
Published on

संसदेचे पावसाळी अधिवेशन लवकरच सुरू होत आहे. त्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल किंवा विस्तार होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काही नेत्यांची नावेही चर्चेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळाल्यास त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांचाच गंभीरपणे विचार होऊ शकतो, अशी शक्यता संजय राऊत यांनी शनिवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.

मला दिसणाऱ्या चित्रानुसार विदर्भातील बावनकुळे हे फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी योग्य नेते आहेत. सर्व घटकांशी संवाद साधण्याची आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची शैली आहे. उलट एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे मला अजिबात वाटत नाही, असेही राऊत म्हणाले.

गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड चांगला नाही. त्यामुळे फडणवीस केंद्रात गेले, तर त्यांच्या शिफारशीने बावनकुळे यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. हे माझे आकलन आणि राजकीय विश्लेषण आहे. त्यांच्या पक्षातले निर्णय घेणारे आम्ही नाही. पण असे घडू शकेल, अशी शक्यता संजय राऊत यांनी वर्तवली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in