
गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएल कोर्टाने अखेर जामीन मंजूर केला आहे. कथित घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी जामिनासाठी सातत्याने अर्ज केला होता. मात्र, प्रत्येक वेळी त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले. त्यामुळे संजय राऊत यांची दसरा-दिवाळीही तुरुंगातच गेली. आता अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
ठाकरे गटाचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांना 31 जुलै 2022 रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, संजय राऊत यांना जामीन देण्यास ईडीने विरोध केला असून, वकील अनिल सिंह हे ईडीची बाजू न्यायालयात मांडत असल्याची माहिती समोर येत आहे.