Sanjay Raut : संजय राऊत यांना आजही जामीन नाहीच, ४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ

संजय राऊत यांच्या जामिनाला ईडीने विरोध केला आहे.
Sanjay Raut : संजय राऊत यांना आजही जामीन नाहीच, ४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ
Published on

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जामीनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. संजय राऊत यांना आजही जामीन मिळू शकला नाही. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांची ४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची न्यायालयीन कोठडी आज संपत असल्याने न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र आजही पुन्हा त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या जामिनाला ईडीने विरोध केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in