Sanjay Raut : दिल्लीमध्ये आल्यावर तुमचा देखील मुसेवाला करणार ; संजय राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून हा धमकीचा मेसेज संजय राऊत यांना पाठवला जात असल्याचा उल्लेख
Sanjay Raut : दिल्लीमध्ये आल्यावर तुमचा देखील मुसेवाला करणार ; संजय राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. या संदर्भात संजय राऊत यांनी पोलिसांना माहिती दिली असून पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला आहे. संजय राऊत यांच्या मोबाईलवर हा धमकीचा मेसेज आला असून त्यांनी AK४७ ने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा मेसेज आला असून त्यावरून आता तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतल्याचेही सांगण्यात येत आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून हा धमकीचा मेसेज संजय राऊत यांना पाठवला जात असल्याचा उल्लेख आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला प्रमाणेच संजय राऊत यांना दिल्लीत मारण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली होती. या संदर्भात संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.

“गेल्या महिन्यातच संजय राऊत यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची माहिती गृहमंत्र्यांना दिली होती. सरकारने याची लवकरात लवकर दखल घ्यावी, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in