Sanjay Raut : मी एक पत्रकार, त्यांची पक्की खबर माझ्याकडे आहे; खासदार संजय राऊत यांचा दावा

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे जामिनावरून बाहेर आल्यानंतर पहिला नाशिक दौरा करत आहेत.
Sanjay Raut : मी एक पत्रकार, त्यांची पक्की खबर माझ्याकडे आहे; खासदार संजय राऊत यांचा दावा
Published on

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हंटले की, "शिंदे गटामध्ये लवकरच स्फोट होणार आहे. मी एक पत्रकार आहे, माझ्याकडे पक्की खबर आहे," असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, संजय राऊत हे पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये गेले आहेत. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. यावेळी त्यांनी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून पक्षाची स्थिती आणि नाशिकच्या राजकीय वातावरणाची माहिती घेतली.

खासदार संजय राऊत म्हणाले की, "माझा पिंड हा पत्रकाराचा आहे. त्यामुळे त्या गटात एकमेकांच्या विरोधात काय चालू आहे याची पक्की खबर मला आहे. त्याचा स्फोट लवकरच होईल," असा दावा त्यांनी केला. पुढे ते म्हणाले की, "ज्या भागातील जे खासदार आणि आमदार निवडून गेले आहेत, त्यांनी पुन्हा एकदा निवडून येऊन दाखवावे. खासदार हेमंत गोडसे यांची तर राजकीय कारकीर्दच संपली आहे. नांदगावपासून मालेगावपर्यंत त्यांनी परत निवडून येऊन दाखवावे." असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.

पुढे ते म्हणाले की, "काही आमदार खासदार सोडून गेले म्हणून काही शिवसेना संपली नाही. ४० गेले असले तरीही पक्ष जमिनीवरच आहे. राज्यात कधीही निवडणूका झाल्या तरी आम्हीच निवडून येऊ. पालिका निवडणूका असतील किंवा अन्य निवडणुका असतील या भीतीपोटी टाळल्या जात आहेत. शिवसेना नवीन चिन्हावरसुद्धा विजयी होईल, आमच्या पक्षाला कुठेही तडा गेलेला नाही." असा विश्वास त्यांनी दर्शवला. 'आम्ही सतत लोकांमध्ये फिरतो आहे. लोकांच्या मनात गद्दारांबद्दल चीड आहे. लोकं शिवसेनेच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहेत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in