
केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन मंडळाने यावर्षी व्हॅलेंटाईन डेला 'काऊ हग डे' जाहीर करून या दिवशी गायींना मिठी मारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. केंद्र सरकार या प्रस्तावावर सकारात्मक विचार करत असतानाच त्यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हा दिवस प्रेमी जोडप्यांसाठी खास आहे आणि या दिवशी त्यांना गायीबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी 'काऊ हग डे' साजरा करण्यासाठी बोलावले जाते. याबाबत राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. गुरुवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना याबाबत विचारले असता त्यांनी मोदींना कठोर शब्दांत टोला लगावला. यावेळी संजय राऊत यांनी गौतम अदानी यांचाही उल्लेख केला.
'काऊ हग डे' संदर्भात केलेल्या आवाहनाबाबत संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी मोदींवर टीका केली. "आम्हाला त्याकडे बघायचे नाही. कारण त्यांची 'पवित्र गाय' म्हणजे अदानी. ते अदानींना 'मिठीत' घेऊन बसले आहेत. आम्ही तिला 'होली काऊ' म्हणतो. या देशात इतर गायींचे काय उरले आहे कारण ते एवढ्या मोठ्या 'गाय'ला मिठी मारून बसलेत ? आम्ही अदानींना 'मिठीत' घेऊ शकत नाही, म्हणून आमच्यासाठी त्यांनी गायी सोडल्या आहेत. पण गाय ही गाय असते, आम्ही त्या गायीचा आदर करतो."