"माझ्या प्रतिउत्तराला उत्तर देण्याइतके ते मोठे नाहीत", संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका; म्हणाले, "आमदार आणि खासदार..."

मुंबई महापालिकेची 90 हजार कोटींची तिजोरी कोणी लुटली? असा सवाल देखील राऊत यांनी यावेळी उपस्थिती केला.
"माझ्या प्रतिउत्तराला उत्तर देण्याइतके ते मोठे नाहीत", संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका; म्हणाले, "आमदार आणि खासदार..."

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत मुजरा करायला जातात, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. यावर एकनाथ शिंदे यांनी आम्ही दिल्लीत मुजरा करायला नाही तर निधी आणायला जातो, असे उत्तर दिले होते. यावरुन पुन्हा एकदा राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. "माझ्या प्रतिउत्तराला उत्तर देण्याइतके ते मोठे नाहीत, ते मुख्यमंत्री जरूर आहेत. त्यांना जो निधी मिळाला तो आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी मिळाला. आमदारांचे 50 कोटी आणि खासदारांचे प्रत्येकी 100 कोटी हा निधी त्यांना दिल्लीतून नक्कीच मिळाला आहे", असे राऊत यांनी म्हटले आहे. ते धुळे येथे पत्रकारांशी बोलत होते.

राज्याच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी निधी संदर्भात फार चर्चा करु नये. नाहीतर तुमचा निधी घोटाळा आम्हाला उघड करावा लागले. मुंबई महापालिकेची 90 हजार कोटींची तिजोरी कोणी लुटली? असा सवाल देखील राऊत यांनी यावेळी उपस्थिती केला. तसेच, राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले हा सुद्धा भूकंप आहे. १० तारीख हा निकालाचा दिवस आहे आणि ते आजारी पडले ही भूकंपाची सुरुवात आहे, असेही राऊत म्हणाले.

ईव्हीएम संदर्भात लवकरात लवकरच भूमिका घेऊ-

ईव्हीएम संदर्भात दिल्लीच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला असून ईव्हीएम संदर्भात पुढे नेमकी काय पावले उचलायची त्यासंदर्भात लवकरात लवकर भूमिका घेऊ, देशातल्या अनेक सामाजिक संस्थांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन केले, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in