संजय राऊतांचा 'दसरा' कारागृहातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ

राऊत यांच्याविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर राऊत यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे
संजय राऊतांचा 'दसरा' कारागृहातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ

गोरेगावमधील १०३९ कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सध्या ईडी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांचा यंदाचा दसरा कारागृहातच जाणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली असून त्याच दिवशी राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी निश्‍चित करण्यात आली आहे.

खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने ३१ ऑगस्ट रोजी अटक केली होती. न्यायालयाने सुरुवातीला ईडी कोठडी दिल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. ही मुदत मंगळवारी संपल्याने कोर्टाने राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली.

दरम्यान, राऊत यांच्याविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर राऊत यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.

ईडीने केले आरोपांचा राऊत यांनी इन्कार करून ईडीच्या तपासावपरच प्रश्‍न चिन्ह उपस्थित केले आहे.हे सर्व राजकिय सुडबुध्दीने करण्यात आलाचा आरोप केला आहे.पत्राचाळ आणि रायगड जिल्ह्यातील कथित भूखंड प्रकरण हे दोन भिन्न प्रकरणे आहेत. असे असताना ईडीचा तपास आणि साक्षीपुरावे हे दिशाहिन आहे. पत्राचाळ प्रकरणात कथित पैशांच्या देवाणघेवणाबाबत साक्षीदारांनी सुरुवातीला दिलेले जबाब सहा महिन्यांनंतरबदलण्यात आलयाचा दावा केला आहे. त्या अर्जाला ईडीने जोरदार आक्षेप धेतला आहे. न्यायालयाने या अर्जावर 10 ऑक्टांबरला सुनावणी घ्याचे निश्‍चित केल आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in