पालखी मुक्कामाच्या ठिकाणी 'जर्मन हँगर'; सातारा जिल्हा परिषदेला ७४ लाखांचा निधी मंजूर

आळंदी ते पंढरपूर दरम्यानच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुक्कामाच्या ठिकाणी जर्मन हँगर व्यवस्था व इतर आवश्यक सोयी सुविधांसाठी शासनाने जिल्हा परिषदेला अतिरिक्त निधी वितरित करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ७४ लाख २६ हजार ४०० रुपयांच्या निधी मंजूर केला.
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी 'जर्मन हँगर'; सातारा जिल्हा परिषदेला ७४ लाखांचा निधी मंजूर
Published on

कराड : आळंदी ते पंढरपूर दरम्यानच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुक्कामाच्या ठिकाणी जर्मन हँगर व्यवस्था व इतर आवश्यक सोयी सुविधांसाठी शासनाने जिल्हा परिषदेला अतिरिक्त निधी वितरित करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ७४ लाख २६ हजार ४०० रुपयांच्या निधी मंजूर केला.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे येत्या २६ जून रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होणार असून, ३० जून रोजी पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होणार आहे. सातारा जिल्ह्यात माऊलींच्या पालखीचा मुक्काम लोणंद, तरडगाव, फलटण व बरड या चार ठिकाणी होणार आहे. या पालखी मुक्कामादरम्यान पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी जर्मन हँगर व्यवस्था व इतर आवश्यक सोयीसुविधांसाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे.

आषाढी वारी पालखी सोहळा २०२५ निमित्त सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालखी मुक्कामाच्या ठिकाणी जर्मन हँगर मंडप व्यवस्था, खंडाळा व फलटण तालुक्यांतील पालखी तळ/वारकरी सुविधा केंद्र यांचे सुशोभीकरण व स्वागत कमान यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने अतिरिक्त ७४ लाख २६ हजार ४०० इतक्या निधीची मागणी केली होती. या मागणीस मान्यता देण्यात आली आहे.

वारकरी व भाविकांकडून समाधान व्यक्त

लोणंद (ता. खंडाळा), तरडगाव (ता. फलटण), निंभोरे (ता. फलटण), फलटण (ता. फलटण) वाजेगाव (ता. फलटण) येथे येथे जर्मन हँगर मंडप उभारण्यासाठी ५४ लाख २६ हजार ४०० रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, तर खंडाळा व फलटण तालुक्यांतील पालखी तळ/वारकरी सुविधा केंद्र यांचे सुशोभीकरण करणे व स्वागत कमान उभारण्यासाठी २० लाखांचा निधी मंजूर झाला, असा एकूण ७४ लाख २६ हजार ४०० इतक्या निधीची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे वारकरी व भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in