संतोष देशमुख हत्या प्रकरण : चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या; वाल्मिक कराड सरकारचा जावई; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी विशाल मोर्चा निघाला. तरीही सरकार जागे झालेले नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण : चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या; वाल्मिक कराड सरकारचा जावई; वडेट्टीवारांचा हल्लाबोल
एक्स @VijayWadettiwar
Published on

मुंबई : सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी विशाल मोर्चा निघाला. तरीही सरकार जागे झालेले नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला अजून अटक होत नाही. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सूत्रधाराला अटक करू, आरोपींवर मकोका लावू अश्या मोठ्या घोषणा केल्या. पण अजून अटक का होत नाही? वाल्मिक कराड हा सरकारचा जावई आहे का? असा सवाल काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रात बीड मध्ये बिहार सारखी परिस्थिती झाली आहे. अनेक जमिनी लुटल्या, खंडणी मागितली जातात, महिलांवर अत्याचार होतात. संतोष देशमुख यांचा अमानुषपणे खून झाला, त्यांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाही का? याचा सूत्रधार वाल्मीक कराडची नार्को टेस्ट झाली पाहिजे.

आतापर्यंत बीड मध्ये झालेल्या हत्या, खंडणी, महिला अत्याचार सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

पोलिसांवर टीका

संतोष देशमुख यांच्या हत्येसारखे प्रकरण होऊन पोलीस वाल्मीक कराडला अटक का करू शकत नाही? परभणीमध्ये भीम सैनिकांवर कारवाई करताना पोलिसांना धार येते मग बीडमध्ये पोलिसांना लकवा मारला आहे का, असा सवाल उपस्थित करत विजय वडेट्टीवार यांनी पोलिसांवर टीका केली.

logo
marathi.freepressjournal.in