वाल्मिक कराडप्रकरणी सरकारी डॉक्टरची चौकशी करा; मनोज जरांगे-पाटील यांची मागणी

वाल्मिक कराड यांना काहीही दुखत नसताना त्याचे डॉक्टर त्याला दुखत असल्याचे सांगत आहेत.
वाल्मिक कराडप्रकरणी सरकारी डॉक्टरची चौकशी करा; मनोज जरांगे-पाटील यांची मागणी
Published on

जालना : वाल्मिक कराड यांना काहीही दुखत नसताना त्याचे डॉक्टर त्याला दुखत असल्याचे सांगत आहेत. त्याला दुखत नसताना त्याला दवाखान्यात का ठेवलं आहे? वाल्मीकला गुन्ह्यातून सोडण्यासाठी डॉक्टर आणि पोलीसांनी हे षडयंत्र केलं आहे का? या प्रकरणी सरकारी डॉक्टरची चौकशी करावी, अशी मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी केले.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

ते म्हणाले की, सगळया आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. या पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करा, सरकारी डॉक्टरची देखील चौकशी करा, अशी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना विनंती आहे.

आता सरकारने एक काम करावे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर काढावेत, त्याच्या ड्रायव्हरचे सीडीआर काढा. तो दुसऱ्यांच्या फोनवरून बोलतो, गेवराई पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला चादरी नेऊन दिल्या. त्यांचीही चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली.

सरकारी डॉक्टरची चौकशी करा

आरोपी सुटले तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, सर्वांची नार्को टेस्ट करा आणि केस अंडर ट्रायल चालवा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in