सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण : गृह विभागाने केली उच्चस्तरीय समिती स्थापन; दोषी पोलिसांवर कारवाईची टांगती तलवार!

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर आता त्यातील निष्कर्षांची छाननी करण्यासाठी आणि दोषींवर कारवाईचा 'ॲक्शन टेकन रिपोर्ट' तयार करण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी एक उच्चस्तरीय 'छाननी समिती' स्थापन केली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर आता त्यातील निष्कर्षांची छाननी करण्यासाठी आणि दोषींवर कारवाईचा 'ॲक्शन टेकन रिपोर्ट' तयार करण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी एक उच्चस्तरीय 'छाननी समिती' स्थापन केली आहे.

नागपूरमध्ये झालेल्या २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात या हत्या प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, १५ जानेवारी २०२५ रोजी निवृत्त न्यायमूर्ती एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. न्यायमूर्ती ताहलियानी समितीने २४ नोव्हेंबर २०२५ रोजी आपला अहवाल शासनाला सादर केला.

या अहवालात या घटनेला जबाबदार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सविस्तर तपशील देण्यात आला तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजनांची शिफारस करण्यात आली. दरम्यान, अपर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती चौकशी समितीच्या निष्कर्षांची सखोल छाननी करणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in