सरस्वती वैद्य हत्या प्रकरण : आरोपी मनोज सानेला ६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

शेजाऱ्यांना त्याच्या फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने ही घटना उघडकीस आली होती
सरस्वती वैद्य हत्या प्रकरण : आरोपी मनोज सानेला ६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

मीरा रोड येथे झाले्या हत्याकांडाने सारा देश हादरला. मनोज साने याने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्यचा खून केला. यानंतर त्याने अत्यंत निर्दयीपणे मृतहेहाचे तुकडे करून काही फेकून दिले तर काहींना शिजवले. शेजाऱ्यांना त्याच्या फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने ही घटना उघडकीस आली. या खूनाचा सुगावा लागल्यानंतर मनोज साने याला अटक करण्यात आली पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरु आहे. न्यायालयाने मनोज सानेला ६ जूलैपर्यंत न्यालायीन कोठडी सुनावली आहे.

मनोज साने याने त्याची लिव्ह इ पार्टनर असलेल्या सरस्वती वैद्यच्या हत्येचा कट रचला होता. मनोज साने याने किटकनाशक खरेदी केलं. त्याने सरस्वतीला ताकात मिसळुन ते किटकनाशक दिलं. ज्यावेळी मनोजला सरस्वतीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यावेळी त्याने सरस्वतीने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचं सांगितलं होतं. तसंच आपण पकडेल जाऊ त्याकरिता मृतदेहाचे तुकडे कुरन नष्ट करत असल्याचे देखील तो पोलिसांना म्हणाला होता.

मनोज साने याने सरस्वीतीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाला निलगिरीचं तेल लावलं होतं. तसंच मृतदेहाची दुर्गंधी पसरू नये याकरिता त्याने घरात रुम फ्रेशनरही मारल होतं पोलिसांनी त्याच्या फ्लॅटमधून निलगिरीच्या पाच बाटल्या देखील जप्त केल्या होत्या. या घटनेमुळे सर्व देश हादरुन निघाला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in