नातेवाईकाचा महिलेवर हातोड्याने हल्ला

रविवार पेठेत राहणारी एक महिला शनिवारी सायंकाळच्या सुमारास रस्त्याने फोनवर बोलत चालली होती. यावेळी तिच्याजवळ एक हेल्मेट व ग्लोव्ह‌्ज घातलेला व्यक्ती आला. त्याच्या हातात हातोडा होता. त्यावेळी त्याने फोनवर बोलणाऱ्या त्या महिलेच्या डोक्यात हातोडा मारला.
नातेवाईकाचा महिलेवर हातोड्याने हल्ला

कराड : सातारा शहरातील पोवई नाका परिसरात असणाऱ्या मरिआई महालक्ष्मी व्यापारी संकुलाच्या पाठीमागील रस्त्यावर शनिवारी सायंकाळच्या सुमारासएका महिलेवर एकाने हातोड्याने हल्ला केला. हातोडा डोक्यात लागल्याने महिला जखमी झाली. जखमी अवस्थेत असलेल्या महिलेने आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी हल्लेखोरास पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने पळ काढला. हल्लेखोर महिलेचा नातेवाईकच असल्याचे म्हटले जात आहे.

रविवार पेठेत राहणारी एक महिला शनिवारी सायंकाळच्या सुमारास रस्त्याने फोनवर बोलत चालली होती. यावेळी तिच्याजवळ एक हेल्मेट व ग्लोव्ह‌्ज घातलेला व्यक्ती आला. त्याच्या हातात हातोडा होता. त्यावेळी त्याने फोनवर बोलणाऱ्या त्या महिलेच्या डोक्यात हातोडा मारला. हातोडा डोक्यात बसल्याने ती महिला जखमी झाली व तिने आरडाओरड केली असता तो आवाज ऐकून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. मात्र हल्लेखोर जमावाच्या तावडीतून सुटण्याच्या प्रयत्नात जखमी झाला. हल्लेखोर हा त्या महिलेचा जवळचा नातेवाईक असून, पैशाच्या वादातून त्याने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. याची कोणतीही नोंद अद्यापपर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यात झालेली नव्हती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in