सातारा जिल्हा बँकेसाठी २३६ अर्ज; दिग्गजांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगत

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी १७० उमेदवारांनी तब्बल २३६ नामनिर्देशनपत्रे दाखल केली.
सातारा जिल्हा बँकेसाठी २३६ अर्ज; दिग्गजांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगत
सातारा जिल्हा बँकेसाठी २३६ अर्ज; दिग्गजांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगतFacebook : Satara DCC Bank
Published on: 

कराड : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी १७० उमेदवारांनी तब्बल २३६ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. बँकेच्या २१ संचालकपदांसाठी अर्जांची संख्या मोठी झाल्याने आता ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या छाननीनंतर आणि त्यानंतरच्या माघारीच्या टप्प्यात निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक कार्यालयात उमेदवार, सूचक, समर्थक आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शिंदे गटाचे शेखर गोरे यांच्यासह विविध राजकीय गटांतील प्रमुखांनी अर्ज दाखल केले.

विकास सेवा सोसायटी मतदारसंघातील ११ जागांसाठी विविध तालुक्यांत मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत.

कुटुंबातील चेहरे रिंगणात

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकपदांसाठी तब्बल २३६ अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. बँकेवरील आपला राजकीय प्रभाव कायम ठेवण्यासाठी काही नेत्यांनी पर्यायी उमेदवार म्हणून कुटुंबातील सदस्यांनाही रिंगणात उतरविल्याचे चित्र आहे. पत्नी, भाऊ, मुलगा तसेच अन्य नातेवाईकांचे अर्ज दाखल झाल्याने काही मतदारसंघांत एकाच राजकीय घराण्यातील एकापेक्षा अधिक चेहरे दिसत आहेत. त्यामुळे ‘घराणेशाही’चा मुद्दाही चर्चेत आला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in