Satara News : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर काळाचा घाला! पेट्रोल भरून परतताना सिमेंट ट्रकने चिरडले

ओंकारने नुकताच माळशिरस तालुक्यातील पाणीव येथे इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता. सोमवारी सायंकाळी तो घरून नायर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यास गेला होता.
Satara News : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर काळाचा घाला! पेट्रोल भरून परतताना सिमेंट ट्रकने चिरडले
मृत - ओंकार रमेश खांडेकर
Published on

कराड : माण तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर रस्त्यावर म्हसवडपासून दोन किलोमीटर अंतरावरील नायर पेट्रोल पंपाजवळ सिमेंटने भरलेल्या ट्रकच्या चाकाखाली येऊन १९ वर्षीय ओंकार रमेश खांडेकर या इंजिनिअरिंग विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

या प्रकरणी ट्रकचालकावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी ट्रक व चालकाला ताब्यात घेतले आहे. घटनेची फिर्याद विजय सोमा खांडेकर (४५) यांनी दिली आहे.

ओंकारने नुकताच माळशिरस तालुक्यातील पाणीव येथे इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता. सोमवारी सायंकाळी तो घरून नायर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यास गेला होता. तेथून पंढरपूर-म्हसवड रोडवर येत असताना, मागून भरधाव वेगाने येणारा १२ चाकी सिमेंट ट्रक त्याच्या अगदी जवळ आला आणि ओंकार थेट पुढील चाकाखाली सापडला. ट्रकचे पुढील चाक त्याच्या पोटावरून गेल्याने त्याचा मृत्यू जागीच झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, नातेवाईक व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा पंचनामा पूर्ण करण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in