Satara : विषारी औषध पिऊन वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या चार दिवसांनंतर घटना उघडकीस

या दोघांनी का आत्महत्या केली? का त्या दोघांवर कोणी विष प्रयोग केला याबाबत उलटसुलट चर्चा सातारा शहरात सुरू आहे.
Satara : विषारी औषध पिऊन वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या चार दिवसांनंतर घटना उघडकीस

कराड : सातारा शहरातील शुक्रवार पेठेतील आर्यांग्ल मेडिकल कॉलेजच्या समोर आत्मगंगा अपार्टमेंटमध्ये रहात असलेल्या उत्तमराव भाऊसाहेब शिंदे (वय ८५) आणि त्यांच्या पत्नी प्रभावती उत्तमराव शिंदे (वय ७५) हे चार दिवसांपासून त्याच्या प्लॅटचे दार उघडत नव्हते.तसेच त्यांच्या प्लॅटमधून दुर्गंधी आल्याने बुध.६ रोजी बाजूच्यांनी याबाबतची माहिती शाहुपूरी पोलिसांना दिली.पोलीसांनी घटनास्थळी येत दरवाजा तोडून फ्लॅट उघडला असता तेथे सडलेल्या अवस्थेत दोघा पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले. दोघांनी विषारी औषध प्रशासन करुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला असला तरी त्या दोघांनी का आत्महत्या केली? का त्या दोघांवर कोणी विष प्रयोग केला याबाबत उलटसुलट चर्चा सातारा शहरात सुरू आहे.

सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात बुधवारी उशिरा फोनवरून याबाबतची माहिती अपार्टमेंटमधील अन्य फ्लॅटधारकांनी दिली असता घटनास्थळी शाहूपुरी पोलिसांनी प्लॅटचा दरवाजा तोडून आतमध्ये जावून पाहिले असता उत्तमराव भाऊसाहेब शिंदे (वय ८५) आणि त्यांच्या पत्नी प्रभावती उत्तमराव शिंदे (वय ७५) या दोघांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत पडले होते. दोघांचे मृतदेह पाहून पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या दोन्ही मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेले. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केले असता त्या दोघांनी विषारी औषध पिल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, याची नोंद शाहुपूरी पोलीस ठाण्यात झाली असून, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in