सातारा : तृतीयपंथीय प्रेयसीने लग्नासाठी तगादा लावला; प्रियकराने कायमचा काटा काढला

माण तालुक्यातील म्हसवडजवळील मसाईवाडी गावाच्या हद्दीत एका प्रियकराने तृतीयपंथीय प्रेयसीने लग्न कर आणि मला घरी घेऊन चल असा तगादा लावल्याने साडीच्या सहाय्याने तिचा गळा आवळून तिचा खून केल्याची घटना घडली.
सातारा : तृतीयपंथीय प्रेयसीने लग्नासाठी तगादा लावला; प्रियकराने कायमचा काटा काढला
Published on

कराड : माण तालुक्यातील म्हसवडजवळील मसाईवाडी गावाच्या हद्दीत एका प्रियकराने तृतीयपंथीय प्रेयसीने लग्न कर आणि मला घरी घेऊन चल असा तगादा लावल्याने साडीच्या सहाय्याने तिचा गळा आवळून तिचा खून केल्याची घटना शनिवारी घडली. पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने खून केल्यानंतर मृतदेहाला सुमारे ३० ते ३५ किलो वजनाचा दगड कंबरेला बांधून विहिरीत टाकून दिले होते. म्हसवड पोलीसांनी जलदगतीने तपास करत सहा तासांतच खुनाचा छडा लावला व आरोपीस गजाआड केले. समाधान विलास चव्हाण , वय ३५, रा.दिवड, ता माण असे संशयित आरोपीचे नाव असून तृतीयपंथी राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटुकडे वय २५ वर्ष असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद तुषार रंगनाथ घुटकडे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली आहे.

सातारा गावच्या हद्दीत कच्च्या रस्त्यालगत असलेल्या एका विहिरीत एक अनोळखी मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याची माहिती परिसरातील लोकांनी पोलिसांना दिली. म्हसवड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. पंचनामा करतेवेळी गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कंबरेस विद्युत वाहक केबलने सुमारे ३० ते ३५ किलो वजनाचा दगड बांधून विहिरीत टाकल्याचे दिसून आले. सदर मृताच्या उजव्या हातावर नाव गोंदलेले असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी त्याआधारेच मयताच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

सदरची माहिती इंस्टाग्राम,व्हाट्सअप,फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियावर प्रसारित केली असता मृताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात संपर्क केला. यावेळी सदरचा मृतदेह तृतीयपंथी राशी उर्फ राहुल घुटुकडेचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मृताचे समाधान विलास चव्हाण याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी त्याला शेतात काम करत असताना ताब्यात घेतले. सुरूवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्याने मयतासोबत प्रेमसंबंध होते व तो/ती आपणास लग्न कर व मला घरी घेऊन चल असा तगादा लावत होता कायमचा काटा काढल्याचे कबूल केले.

logo
marathi.freepressjournal.in