जेष्ठ किर्तनकार बाब महाराज सातारकर यांच काल निधन झालं. त्यांच्या जाण्याने लाखो वारकऱ्यांवर दुखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या विचारांना जीवंत ठेवण्यासाठी राज्य सरकारने त्यांचं स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबा महाराज सातारकरांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी बाबा महाराजांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.
यावेळी माध्यमांशी बोलातना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार बाबा महाराजांचं स्मारक उभारेल अशी घोषणा केली आहे. जेष्ठ किर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं स्मारक तर होईलच पण, त्यांच्या विचारांचं जीवंत स्मारक उभारण्याबाबत त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करणार. जेणेकरुन या जीवंत स्मारकाच्या माध्यमातून त्यांच्यासारखे आणखी विचारक तयार होतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
कोण आहेत बाबा महाराज सातारकर ?
जगभरात ज्येष्ठ किर्तनकार अशी बाबा महाराज सातारकर यांची ख्याती होती. बाबा महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या सेवेची सव्वाशेवर्षाची परंपरा जपली होती. ते आपल्या आजोबा, आई-वडिलांसोबत लहानपणापासूनच वारी करायचे. त्यांची वारीची परंपरा ही वयाच्या ८३ वर्षापर्यंत सुरु ठेवली होती. बाबा महाराज यांच्यावर दादा महाराजांचा पगडा होता. ते लहानपणापासूनच दादा महाराजांचे लाडके होते. ते लहानपणापासून बाब महाराजांसमोर बसून किर्तन ऐकायचे.
५ फेब्रुवारी १९३६ रोजी साताऱ्यात बाबा महाराजांचा जन्म झाला. त्यांनी आपलं दहावीपर्यंतच शिक्षण दे इंग्रजीतून पूर्ण केलं. बाबा महाराजांच्या घरातच शेकडोवर्षापासूनची परंपरा आहे. बाबा महाराजारंनी शेवटच्या श्वासापर्यंत ही परंपरा जपली. त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षी दादा महाराजांच्या किर्तनात चाल म्हटली होती. त्यांनी दादा महाराजांना पायाला दखम असतानाही चिखलात उभं राहून कीर्तन करताना पाहिलं आणि हिच निष्ठा शेवटपर्यंत जपली.
दादा महाराज हे बाबा महाराज सातारकर यांचे आजोबा होते. त्यांनी एक नातू म्हणून आजोबांकडून सर्व गुण आत्महसात केलं. त्यांच्या पूर्ण पिढीत आजवर कोणी वारी चुकवलेली नाही. आजोबा दादा महाराज, वडील, भाऊ महाराज त्यांनंतर बाब महाराज आणि आता पुढची पिढी मुलगी भगवतीताई, नातू चिन्मय महाराज अशी त्यांची संपूर्ण पिढी भागवत धर्माच्या सेवेत आहे. वयाच्या ८३ व्या वर्षी बाबा महाराज यांनी लिहिलेल्या लेखात सांगितले होते की, माझं वय ८३ वर्ष आणि माझी वारी ८४ वी. त्याचं कारण म्हणजे माझी एक वारी आईच्या पोटात झाली आहे. वयोमानाने वारी चालणं शक्य होत नसताना देखील चार पावले चालून गाडीतून वारी अनुभवायचे.