प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडल्याचे समाधान; कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांचे प्रतिपादन

माझ्या कार्यकाळात विद्यापीठातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत.
प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडल्याचे समाधान; कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांचे प्रतिपादन

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून आज मला पाच वर्षे पूर्ण झाले आहे. या पाच वर्षांमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी यशस्वीपणे काम करू शकलो. माझ्या कार्यकाळात विद्यापीठातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडल्याचे मला समाधान आहे, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी यावेळी व्यक्त केले.

ते शनिवारी (दि. ४) विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहातील मंचावर निरोप संभारंभामध्ये आपले मनोगत व्यक्त करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी मीरा भोसले, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे, अधिष्ठाता डॉ. डी. एम. खंदारे, डॉ. एम के. पाटील, जाधव मॅडम, डॉ. दिपक पानसकर, डॉ. विकास सुकाळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सूर्यकांत जोगदंड, डॉ. माधुरी देशपांडे, डॉ. सुरेखा भोसले, डॉ. डी. एन. मोरे, डॉ. संतराम मुंडे, नारायण चौधरी, हनमंत कंधारकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, क्रीडा विभागाचे प्र. संचालक डॉ. मनोज रेड्डी, नवउपक्रम नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. राजाराम माने, डॉ. शैलजा वाडीकर, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर यांची यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यांना पुष्पगुच्छ, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल इत्यादी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in