
बीड : सतीश भोसले उर्फ खोक्याला बुधवारी उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. बीड पोलीस आणि उत्तरप्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या हा भाजपचे बीडमधील आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. सतीश भोसलेने केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक
भोसले गेल्या काही दिवसांपासून फरार होता.
विशेष म्हणजे सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे कुंभमेळ्यात असू शकतो, असा अंदाज एका कार्यक्रमात वर्तवला होता. मात्र, आता कुंभमेळ्यात त्यांचाच कार्यकर्ता असलेला भोसले सापडला.
सतीश भोसलेवर गेल्या ७ दिवसांमध्ये ३ गुन्हे दाखल झाले आहेत. खोक्याला बीडमध्ये आणण्यापूर्वीच त्याच्यावर तडीपारीच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी त्याच्या हद्दपारीसाठी महसूल विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला उपविभागीय दंडाधिकारी कविता जाधव यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे, आता खोक्या उर्फ सतीश भोसलेची बीड जिल्ह्यातून हद्दपारी निश्चित झाली आहे. याबाबचे पत्र शिरुर कासार पोलिसांना देण्यात आले आहे.
प्रयागराजमध्ये लपून बसलेला असताना सतीश भोसलेला पोलिसांनी अटक केली. एका व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाचा भोसलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो फरार झाला होता. तो महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात फिरल्यानंतर प्रयागराजला गेल्याचे पोलिसांना समजले आणि त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली आहे.
खोक्यामागचा बोक्या शोधा - वडेट्टीवार
खोक्या भेटला हे चांगलेच झाले. पण त्यांच्या मागचे बोके कोण हे शोधले पाहिजे. इकडे बाकाचा आका शोधला तसा खोक्याचा बोका शोधा. त्याच्याकडे इतके पैसे आले कुठून आले, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.