
मुंबई : पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने २२ एप्रिल ते महाराष्ट्र दिन १ मे या कालावधीत पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यात 'पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा' (पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाओ) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.
'पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा' या उपक्रमांतर्गत मंत्री पंकजा मुंडे २२ एप्रिल रोजी मुंबईतील पवई तलाव येथे स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंडे यांनी केले आहे. २२ एप्रिलला पर्यावरण वातावरणीय बदल विभागामार्फत एक संकल्पना राबवली जाणार आहे. २३ एप्रिलपासून १ मेपर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
२२ एप्रिल रोजी कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. २२, २३ आणि २४ एप्रिल रोजी आपण सर्वांनी आपापल्या भागातील पाण्याचे विविध स्रोत साफ करायचे आहेत. ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकापासून ते जिल्हा परिषद सीईओपर्यंत, तलाठ्यापासून ते जिल्हाधिकारीपर्यंत, ग्रामपंचायतच्या सरपंच, सदस्यापासून ते जिल्हा परिषद अध्यक्षापर्यंत आणि आमदार, खासदार, पालकमंत्री या सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा.
- पंकजा मुंडे, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री