खा. चिखलीकर यांच्या प्रयत्नांमुळे सात रुग्णांना जीवदान; प्रधानमंत्री सहाय्यता निधीतून निधी मंजूर

बिहार राज्यातील परंतु सध्या नांदेड येथे वास्तव्यात असलेल्या चिंतादेवी यांना कॅन्सरच्या उपचारासाठी तीन लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
खा. चिखलीकर यांच्या प्रयत्नांमुळे सात रुग्णांना जीवदान; प्रधानमंत्री सहाय्यता निधीतून निधी मंजूर

नांदेड : जिल्ह्यात विकासाची कामे मोठ्या प्रमाणात करत असताना खा. प्रतापराव पाटील-चिखलीकर यांच्या पुढाकारातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला उपचारासाठी भरीव असा निधी प्राप्त होत आहे. यापूर्वी अनेक रुग्णांना प्रधानमंत्री सहायता निधीतून भरपूर निधी मिळवून देणाऱ्या खा. चिखलीकर यांच्या प्रयत्नामुळे आणखी सात रुग्णांना जीवदान मिळणार आहे. त्यासाठी रुग्णांच्या उपचारासाठी प्रधानमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य करण्यात आले आहे.

उमरी तालुक्यातील धानोरा येथील अर्जुन सिद्धनाथ बाबर यांच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यांना खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सहकार्यातून आणि प्रयत्नातून प्रधानमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

बिहार राज्यातील परंतु सध्या नांदेड येथे वास्तव्यात असलेल्या चिंतादेवी यांना कॅन्सरच्या उपचारासाठी तीन लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राजू दिनाजी तारके यांच्यावरही हृदयरोग शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यांच्यासाठी पन्नास हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उमरी तालुक्यातील गोरठा येथील पुनम बालाजी करपे या महिलेच्या हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी पन्नास हजार रुपयांचे निधी मंजूर करण्यात आला.

देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील अंबाबाई लच्छमना पिनलवार यांच्या कॅन्सरवरील उपचारासाठी अडीच लाख रुपयांचा निधी प्रधानमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर करण्यात आला असून, त्यांच्यावर कमलनयन बजाज हॉस्पिटल संभाजीनगर येथे उपचार करण्यात येत आहेत. उमरी तालुक्यातील वाघाळा येथील रेखाबाई खंडू बिरगाळे यांच्या कॅन्सर उपचारासाठी अडीच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्यावरही कमलनयन बजाज हॉस्पिटल संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत; तर मुखेड तालुक्यातील जाहूर येथील कमलीकर ललिता बालाजी यांच्या कॅन्सरवरील उपचारासाठी एक लाख ९७ हजार पाचशे रुपयांचा निधी प्रधानमंत्री सहायता निधीतून मंजूर करण्यात आला आहे. मंजूर झालेला निधी रुग्ण ज्या रुग्णालयात उपचार घेत आहेत त्या रुग्णालयाच्या बँक खात्यात जमा झाला असल्याची माहिती खा. चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in