सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यात हृदय शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर असून लवकरच घरी सोडणार - डॉ. साबळे

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या छातीत त्रास झाल्याचे जाणवू लागल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी प्राथमिक तपासणी व काही चाचण्या केल्या. त्यामध्ये हृदयाच्या एका रक्तवाहिनीत दोष असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सयाजी शिंदे यांना तत्काळ अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला देण्यात आला.
सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यात हृदय शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर असून लवकरच घरी सोडणार - डॉ. साबळे

कराड : मराठीसह हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हृदयावर ११ एप्रिल रोजी साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली. छातीत त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यावेळी डॉक्टरांनी वरील शस्त्रक्रिया केली.

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या छातीत त्रास झाल्याचे जाणवू लागल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी प्राथमिक तपासणी व काही चाचण्या केल्या. त्यामध्ये हृदयाच्या एका रक्तवाहिनीत दोष असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सयाजी शिंदे यांना तत्काळ अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला देण्यात आला. डॉ. साबळे यांच्या सल्ल्यानुसार गुरुवारी ही अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पार पडली. सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत असून दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज देणार असल्याचे डॉ. साबळे म्हणाले.

अँजिओग्राफीमध्ये हृदयातील तीनपैकी दोन रक्तवाहिन्या नॉर्मल तर उजव्या बाजूच्या रक्तवाहिनीमध्ये ९९ टक्के ब्लॉक होता व हा ब्लॉक रिस्की असल्याने त्याची अँजिओप्लास्टी करण्यास त्यांनी तत्काळ संमती दिली. हृदयविकाराचा झटका येण्याआधी ते फार जागृत होते. त्यांनी सगळ्या गोष्टी सकारात्मकतेने हाताळून वेळीच उपचार केले. आता त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना घरी सोडण्यात येईल. आता त्यांच्या शरीरातील सगळ्या गोष्टी व रिपोर्ट्स स्टेबल आहेत, अशी माहितीही डॉ.साबळे यांनी माध्यमांना दिली.

logo
marathi.freepressjournal.in