डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या शुभहस्ते 'स्काल्प कुलिंग' तंत्रज्ञानाचे अनावरण

स्काल्प कुलिंग हे केमोथेरपी दरम्यान होणाऱ्या केसगळतीला रोखणारे तंत्रज्ञान कॅन्सर रुग्णांसाठी वरदान आहे
डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या शुभहस्ते 'स्काल्प कुलिंग' तंत्रज्ञानाचे अनावरण
Published on

मुंबई ऑन्कोकेअर सेंटर या भारतातील सर्वांत मोठ्या कॅन्सर डे केअर संस्थेच्या कोल्हापूर शाखेने, दि ७ मे २०२३ रोजी कोल्हापूर जिल्हा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पाहिल्या "स्काल्प कुलिंग" तंत्रज्ञानाचे अनावरण माननीय प्रशासक व आयुक्‍त, कोल्हापुर महानगरपालिका, डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या शुभहस्ते केले.

"स्काल्प कुलिंग हे केमोथेरपी दरम्यान होणाऱ्या केसगळतीला रोखणारे तंत्रज्ञान कॅन्सर रुग्णांसाठी वरदान आहे", असे मुंबई ऑन्कोकेअर सेंटरचे कर्करोगतज्ञ् डॉ अक्षय शिवछंद अनावरण प्रसंगी आमच्या प्रतिनिधींना म्हणाले. 

 केस जातील या भीतीने केमोथेरपी नाकारणाऱ्या कॅंसर रुग्णांची संख्या अमाप आहे. परंतू केमोथेरपी हा कॅंसर उपचारप्रणालीतील एक अविभाज्य घटक आहे आणि त्याचे फायदे जागतिक स्तरावर सर्वश्रुत आहेत. या अनुषंगाने या तंत्रज्ञानाचा कोल्हापूरातील कॅंसर, विशेषत: महिला रुग्णांना नक्कीच फायदा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 

या प्रसंगी बोलताना डॉ. बलकवडे म्हणाल्या "कर्करोग हा शारीरिक व मानसिक खच्चीकरण करणारा आजार आहे. यावरील उपचार, उदा. केमोथेरपी घेताना ६०% -७०% रुग्णांमध्ये होणारी केसगळती ही त्यांचे मानसिक स्वास्थ अधिकचं बिघडवते. स्काल्प कुलिंग तंत्रज्ञानामुळे  केमोथेरपीच्या या दुष्पपरिणामापासून रुग्णांना दिलासा मिळेल अशी आशा मी व्यक्त करते".

कोल्हापूरसारख्या छोट्या शहरात असे अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करण्याच्या मुंबई ऑन्कोकेअर व डॉ. अक्षय शिवछंद यांच्या धोरणी निर्णयाचे त्यांनी कौतुकही केले.अनावरण सोहळ्याकरीता डॉ. अक्षय शिवछंद- कर्करोगतज्ञ, डॉ. सारंग वाघमारे- रक्तविकारतज्ञ, डॉ.अमृता शिवछंद- नवजातशिशुतज्ञ, तसेच कोल्हापुरातील नामांकित डॉक्टर्स उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in