
जळगाव : आता पोलीस स्टेशन वर जाण्याची गरज नाही क्यूआर कोड स्कॅन करा आणि आलेल्या अर्जावर पोलिसात तक्रार नोंदवता येणार आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक महेश्वर रेडडी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम समोर आला असून जळगाव पोलिसांनी हा अभिनव उपक्रम राबवण्यास आजपासून प्रारंभ केला आहे. याच बरोबर पोलिस स्टेशनच्या कागिरीचे मूल्यमापन करण्यासाठी एक तक्रार निवारण अर्ज तयार करण्यात आला असून या आधारे संबंधीत पोलीस स्टेशनच्या कार्याचे मूल्यमापन होणार आहे. या अर्जाचे विमोचन देखील आज पोलिस अधिक्षक महेश्वर रेडडी, अतिरिक्त पोलिस अधिक्षक अशोक नखाते यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषदेत सायंकाळी करण्यात आले.
सामान्य नागरिकांना पोलिस स्टेशनमध्ये जाण्याची भीती वाटते. काहींना तक्रार देतांना आपले नाव देण्याची इच्छा नसते. अशावेळी नागरिकांनी संबंधीत क्यूआर कोड स्कॅन केला असता संगणकावर अर्ज येईल तो भरून तक्रार दयायची आहे. काही वेळा एखाद्या ठिकाणी पोलिस तात्काळ पोहचणे गरजेचे असते अशावेळी हा क्यूआर कोड स्कॅन करून तक्रार दिल्यास पोलिस तात्काळ पोहचण्यास मदत होईल असे जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेडडी यांनी बोलतांना सांगितले. जळगाव जिल्हयासाठी हा अभिनव उपक्रम राबवला जात असून राज्यातील पहिलाच असावा पण उत्त्र महाराष्ट्राततील पहिला प्रयोग असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांना चांगल्या सेवे बददल मार्गदर्शनकरणे व सेवा मिळाली किंवा कसे या बाबत मूल्यांकन करणे हा या मागचा उद्देश असल्याचे पोलिस अधिक्षक महेश्वर रेडडी यांनी सांगितले. मूल्यांकनासाठी एक ते पाच गुण असून ते नागरिक देतील. भरलेला हा फॉर्म पोलिस स्टेशनमध्ये ठेवलेल्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. यावरून संबंधीत पोलिस स्टेशनच्या सेवेचे मूल्यांकन होईल असे रेडडी यांनी सांगितले.
पोलीस स्टेशन सेवेचे होणार मूल्यांकन
जिल्हयातील पोलीस स्प्रेशनची कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये एक फॉर्म उपलब्ध असेल. त्यात पोलिस ठाणे कोणत्या विभागाशी आपली समस्या संबंधीत आहे, कोणत्या अधिका-यास भेटायचे आहे, संबंधीत पोलिस ठाण्यात येण्याची व तेथून जाण्याची वेळ, तक्रार निवारण झाली काय, सुविधांची स्वच्छता, कर्मचा-यांचे वर्तन, प्रतिक्षावेळ कमी करण्यासाठी उपाय यासह आपला अभिप्राय या फॉर्ममध्ये नोंदवायचा आहे.