चॉकलेटचे आमिष दाखवून शाळकरी मुलींचा विनयभंग

बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच पेण तालुक्यातील दादर गावात अल्पवयीन शाळकरी मुलींना मोबाईल व चॉकलेटचे आमिष दाखवून मुलींचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
चॉकलेटचे आमिष दाखवून शाळकरी मुलींचा विनयभंग
Published on

पेण : बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच पेण तालुक्यातील दादर गावात अल्पवयीन शाळकरी मुलींना मोबाईल व चॉकलेटचे आमिष दाखवून मुलींचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे.

पेण तालुक्यातील दादर गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात शाळेत शिकणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींना मंगळवारी दुपारच्या सुमारास अखिलेश शामजी सैनी (२०) व मुंनुकुमार त्रिभुवन चौहान (२२) यांनी मोबाईल व चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन विद्यार्थिनींची अश्लील हावभाव करून छेड काढली. याप्रकरणी अल्पवयीन मुलींच्या नातेवाईकांना, गावकऱ्यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी दोन्ही परप्रांतीयांना पकडून बेदम चोप दिला व त्यांना डांबून ठेऊन दादर सागरी पोलिसांच्या ताब्यात दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशे हे अधिक तपास करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in