
कराड : तबला पेटी वाजवण्याचा क्लाससाठी गेलेल्या एका शाळकरी मुलाचा मृतदेह शेततळ्यात आढळून आला असून शंभूराज शशिकांत राजमाने (९) असे त्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शशिकांत राजमाने यांचा एकुलता एक मुलगा
शंभूराज मंगळवारी दुपारी तबला आणि पेटी वादनाच्या क्लासला गेला होता. रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही म्हणून पालकांनी नलवडे व त्यांच्या मुलांना विचारले असता तो आज क्लासला आला नाही, असे सांगण्यात आले.
त्यावेळी शंभूराजच्या पालकांनी शोधाशोध केल्यानंतर तो नलवडे यांच्या घरामागे असणाऱ्या शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याचे आढळून आले. या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे.