महाराष्ट्रात शाळा होतील आर्थिकदृष्ट्या सुखकर ; 'वरथाना' ठरतंय शाळांसाठी वरदान

एकट्या महाराष्‍ट्रात वरथानाने २,१०३ हून अधिक शाळांना साह्य केले आहे, जेथे राज्‍यामध्‍ये ३७१ कोटी रूपयांचे कर्ज दिले आहे.
महाराष्ट्रात शाळा होतील आर्थिकदृष्ट्या सुखकर ; 'वरथाना' ठरतंय शाळांसाठी वरदान

शिक्षण लक्षवेधक क्षेत्र बनले असलेल्‍या युगामध्‍ये आजही काही शाळा आहेत, ज्‍या आपल्‍या क्षमतेचा वापर करत विद्यार्थ्‍यांच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहेत आणि उज्‍ज्‍वल भविष्‍यासाठी त्‍यांचे मार्गदर्शन करत आहेत. श्रीमंतांसाठी शिक्षणाच्‍या अनेक संधी उपलब्‍ध आहेत, पण मध्‍यमवर्गीय व अल्‍प-उत्‍पन्‍न असलेल्‍या गटांसाठी स्थिती काहीशी चिंताजनक आहे. त्‍यांच्‍या उज्‍ज्‍वल भविष्‍यासाठी दर्जेदार शिक्षण हा एकमेव मार्ग आहे.

आर्थिकदृष्‍ट्या स्थिर पार्श्‍वभूमीमधील विद्यार्थ्‍यांसाठी आंतरराष्‍ट्रीय शैक्षणिक संस्‍थांसह शिक्षणाचे अनेक मार्ग उपलब्‍ध आहेत. पण ही स्थिती सर्व समाजासाठी समान नाही. अनेक गरीब व मध्‍यमवर्गीय व्‍यक्‍ती त्‍यांच्‍या मुलांच्‍या शिक्षणासाठी सरकारी शाळा व परवडणाऱ्या खाजगी शाळांवर अवलंबून आहेत. दुर्दैवाची बाब म्‍हणजे या शाळांना अनेक आव्‍हानांचा सामना करावा लागतो. तसेच शालेय संस्‍थाचालकांना आर्थिक अडचणी, कर्मचाऱ्यांचा अभाव, शिक्षणाप्रती लिंग-आधारित तफावत, अध्‍यापन दर्जासंदर्भात समस्‍या, मजूरीसाठी विद्यार्थ्‍यांची गळती, तंत्रज्ञानामधील मर्यादा आणि अपुऱ्या पायाभूत सुविधा अशा समस्‍यांचा सामना करावा लागतो. कोविड-१९ महामारीच्‍या प्रार्दुभावामुळे या समस्‍यांमध्‍ये अधिक वाढ झाली.

सरकारने अशा शाळांना साह्य करण्‍यासाठी अनेक उपक्रम सुरू केले असले तरी अनेकदा हे उपक्रम निष्क्रिय ठरतात, ज्‍यामुळे शालेय संस्‍थाचालकांना पर्यायी सोल्‍यूशन्‍सचा शोध घ्‍यावा लागतो. या समस्‍यांचे निराकरण करण्‍याच्‍या उद्देशाने वरथाना या नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनीने (एनबीएफसी) पुढाकार घेतला आहे. ही कंपनी पायाभूत सुविधा व इतर सुविधांच्‍या विकासासाठी खाजगी परवडणाऱ्या शाळांना कर्ज प्रदान करण्‍यामध्‍ये विशेषीकृत आहे. भारतातील सर्व प्रदेशांमध्‍ये या कंपनीचे क्‍लायण्‍ट्स आहेत.

ठाणे येथील मालतीदेवी विद्यालयाचे चेअरपर्सन प्रभाकर उपाध्‍याय वरथानाच्‍या प्रभावाचे समर्थन करतात. ते म्‍हणाले, ''वरथाना आमची विकास सहयोगी आहे. आम्‍ही आमच्‍या शाळेच्‍या इमारतीमध्‍ये नवीन मजल्‍याची भर करत पायाभूत सुविधा वाढवण्‍यासाठी कर्ज घेतले. आम्‍ही नवीन बेंचेस् व संसाधने आणली, तसेच विद्यार्थीनी व विद्यार्थ्‍यांसाठी स्‍वतंत्र स्‍वच्छतागृहाचे बांधकाम केले. यामुळे विद्यार्थ्‍यांच्‍या नोंदणीमध्‍ये २०० वरून ३५० पर्यंत वाढ झाली.''

वरथानाचा प्रभाव १५ राज्‍यांमध्‍ये दिसून आला आहे, जेथे देशभरातील ९,००० हून अधिक परवडणाऱ्या खाजगी शाळांना फायदा होण्‍यासह चार दशलक्ष विद्यार्थ्‍यांच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडून आला आहे. एकट्या महाराष्‍ट्रात वरथानाने २,१०३ हून अधिक शाळांना साह्य केले आहे, जेथे राज्‍यामध्‍ये ३७१ कोटी रूपयांचे कर्ज दिले आहे. वरथानाची शाळा व विद्यार्थ्‍यांप्रती कटिबद्धता कंपनीला इतर कर्जदात्यांच्‍या तुलनेत वरचढ ठरवते. कंपनी प्रत्‍येक टप्‍प्‍यावर शाळांसोबत सहयोग करत शिक्षक अपस्किलिंग, संस्‍थाचालक व्‍यवस्‍थापन प्रशिक्षण, तंत्रज्ञान साह्य आणि विद्यार्थ्‍यांसाठी शैक्षणिक कर्ज अशा सुविधा देते.

वैयक्तिक गाथांमधून कंपनीचा अनुकूल प्रभाव दिसून येतो. महाराष्‍ट्रातील तालुका सिंधखेडामधील गाव मालपूर येथील गुरूकुल इंग्लिश मीडियम स्‍कूलचे अध्‍यक्ष युवराज सावंत वरथानाचे आभार व्‍यक्‍त करत म्‍हणाले, ''आमच्‍या प्रगतीचे श्रेय वरथानाला जाते. त्‍यांच्‍या साह्यामुळे आम्‍हाला बांधकाम पूर्ण करता आले, तसेच संगणक, स्‍कूल बसेस खरेदी करता आले आणि बॉण्‍ड्री वॉल (सीमा भिंत) बांधता आली, ज्‍यामुळे विद्यार्थ्‍यांच्‍या नोंदणीमध्‍ये वाढ झाली.'' भारताची अर्थव्‍यवस्‍था देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर झपाट्याने विकसित होत आहे. या वाढीमुळे कुशल कर्मचारीवर्गासाठी मागणी वाढत आहे. शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्‍था हे कर्मचारीवर्ग प्रदान करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतील.

समाजातील सर्व व्‍यक्‍तींसाठी उपलब्‍ध असणारी उत्तमरित्‍या विकसित शैक्षणिक यंत्रणा देशाच्‍या एकूण विकासासाठी आवश्‍यक आहे. यामागील कारण म्हणजे शिक्षणामुळे व्‍यक्‍तीला जॉब मार्केटमध्‍ये आवश्‍यक असलेली कौशल्‍ये व ज्ञान मिळते. तसेच शिक्षणामुळे सामाजिक गतीशीलतेला चालना मिळण्‍यास आणि अधिक समान समाजाची निर्मिती होण्‍यास देखील मदत होते.

logo
marathi.freepressjournal.in