स्क्रॅप रिक्षांवर होणार कारवाई; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम, नियमबाह्य रिक्षा रडारवर

नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका बनल्या आहेत. अशा रिक्षांमधून प्रवासी वाहतूक होताना त्या कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर दिसता कामा नयेत. स्क्रॅप रिक्षांविरोधात ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार वाहन परिवहन विभागाला दिले आहेत.
स्क्रॅप रिक्षांवर होणार कारवाई; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम, नियमबाह्य रिक्षा रडारवर
स्क्रॅप रिक्षांवर होणार कारवाई; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम, नियमबाह्य रिक्षा रडारवर'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका बनल्या आहेत. अशा रिक्षांमधून प्रवासी वाहतूक होताना त्या कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर दिसता कामा नयेत. स्क्रॅप रिक्षांविरोधात ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार वाहन परिवहन विभागाला दिले आहेत.

स्क्रॅप झालेल्या किंवा नियमबाह्य रिक्षांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर होत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत परिवहन मंत्री सरनाईक यांनी शुक्रवारी विशेष बैठक घेतली. परिवहन आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, रिक्षा-टॅक्सी युनियनचे नेते शशांक राव तसेच राज्यभरातील रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

“प्रवाशांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. नियमबाह्य आणि धोकादायक वाहनांमधून प्रवासी वाहतूक करण्यास कोणतीही मुभा दिली जाणार नाही,” असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. स्क्रॅप घोषित झालेल्या रिक्षांचा पुन्हा वापर, बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांची नोंदणी किंवा नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी करण्यात यावी. संबंधित वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यासोबतच आवश्यक ती कठोर पावले उचलावीत,” असे निर्देशही त्यांनी दिले.

राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवावी आणि ५ ऑक्टोबरपर्यंत स्क्रॅप रिक्षांविरोधातील कारवाईचा आढावा सादर करावा, असेही त्यांनी सांगितले. रिक्षा-टॅक्सीचालक आणि संघटनांनीही प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत नियमांचे पालन करावे. नियमबाह्य वाहनांमुळे संपूर्ण रिक्षा व्यवसायाची प्रतिमा खराब होऊ नये, यासाठी अधिकृत आणि सुरक्षित वाहनांनाच प्रवासी वाहतुकीची परवानगी असावी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in