सोलापूर एमडी ड्रग्ज कारखान्याच्या दुसऱ्या मालकाला अटक

या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे
सोलापूर एमडी ड्रग्ज कारखान्याच्या दुसऱ्या मालकाला अटक

मुंबई : सोलापूर येथील एमडी ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केल्यानंतर या कटातील दुसऱ्या मालकाला वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. रामगौड चंद्रायगोड इडगी ऊर्फ राजू गौड असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत यापूर्वी किरणकुमार सूर्यकांत बिराजदार, राहुल किशन गवळी, अतुल किशन गवळीसह अन्य एका आरोपीस प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने अटक केली होती. त्यांच्याकडून आतापर्यंत पोलिसांनी ११६ कोटीचा एमडी ड्रग्जसहित इतर साहित्य जप्त केले आहे. १४ ऑक्टोंबरला खार परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या राहुल व किशन या दोन बंधूंना अटक केल्यानंतर सोलापूर येथील एमडी ड्रग्जच्या कारखान्यांचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले होते. किरणकुमार आणि रामगौड यांनी हा कारखाना सुरु केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in