
पेण : कोलाड येथील तिसे रेल्वे फाटकावर सुरक्षा रक्षक चंद्रकांत कांबळे यांच्यावर अज्ञात इसमाने गोळीबार केला. त्यांच्या कपाळात गोळी घुसली. कांबळे रक्ताच्या थारोळ्यात पडले,त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कांबळे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार करून पोबारा केला. रेल्वे सुरक्षा रक्षक चंद्रकांत कांबळे यांची गोळीबार करून हत्येचा तपास सुरू केला असल्याचे कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी सांगितले.