राजकीय आकसापोटी कुटुंबीयांची सुरक्षा काढली - एकनाथ शिंदे

तुमच्याकडे सत्ता आहे का? मी हवेत बोलत नाही. बंडखोरी करणाऱ्यांनी आपली आमदारकी वाचवा. मी देवेंद्र फडणवीस यांना सांगेन की,
राजकीय आकसापोटी कुटुंबीयांची सुरक्षा काढली - एकनाथ शिंदे
ANI

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने बंडखोर शिवसेना आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतल्याचा दावा शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि डीजीपी महाराष्ट्र यांना पत्र लिहून '38 आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा राजकीय आकसापोटी काढून घेण्यात आली आहे.' यासाठी तुम्ही जबाबदार असल्याचे पत्रात म्हटले आहे.'

बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एकनाथ शिंदे यांच्या आरोपावर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, आम्ही कोणाचीही सुरक्षा काढलेली नाही, लोकांमध्ये नाराजी आहे. तुमच्याकडे सत्ता आहे का? मी हवेत बोलत नाही. बंडखोरी करणाऱ्यांनी आपली आमदारकी वाचवा. मी देवेंद्र फडणवीस यांना सांगेन की, या गोंधळातून बाहेर राहा, नाहीतर ते अडकतील.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in