तारापूर अणुशक्ती केंद्रातून रायफल आणि जिवंत काडतुसांसह सुरक्षा जवान बेपत्ता

पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे.
तारापूर अणुशक्ती केंद्रातून रायफल आणि जिवंत काडतुसांसह सुरक्षा जवान बेपत्ता

अति संवेदनशील असलेल्या पालघर तालुक्यातील तारापूर येथील भाभा अणुऊर्जा प्रकल्पात बंदोबस्तासाठी तैनात असलेला सीआयएसएफचा जवान त्याच्यासोबत बंदूक आणि ३० जिवंत काडतुसासह बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. तो कुठे गेला, त्याने ही काडतुसे का घेतली, तो कोणाला भेटला आणि तो सध्या कुठे आहे. या प्रश्नांनी सर्व सुरक्षा यंत्रणा चक्रावली असून या जवानांचा युद्धपातळीवर तपास सुरू आहे. त्यामुळे या राष्ट्रीय प्रकल्पाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. हा प्रकल्प अति संवेदनशील असल्याने या ठिकाणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला जातो. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत असलेला केंद्रीय औद्योगिक दलाचा जवान स्वतःजवळ असलेली रायफल आणि ३० जिवंत काडतुसांसह काल दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक गायब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

मनोज यादव असे या गायब झालेल्या जवानाचे नाव असून तो सन २०१०पासून सेवेत असून दोन महिन्यांपासून तो तारापूर येथील अणुशक्ती केंद्रात रुजू झाला होता. मूळचा अहमदाबाद गुजरातचा राहणारा असल्याचे समजते. तारापूर येथे असलेल्या सीआयएसएफ कॉलनीमध्ये राहणारा हा जवान काही तासानंतर पुन्हा रुजू होईल याच्या प्रतीक्षेत सीआयएसएफचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in