ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेची सुविधा

दिव्यांग मतदारांच्या बाबतीत मतदाराचे अपंगत्व ४० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, असा सक्षम प्राधिकारी यांचा दाखला असणे आवश्यक आहे. मतदान केंद्रनिहाय अशा मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत नमुना १२ ड चे वाटप घरोघरी करण्यात येत आहे.
ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेची सुविधा

रत्नागिरी : येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या ८५ वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मतदारांना व ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग मतदारांना टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ही सुविधा ऐच्छिक आहे, अशी माहिती माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली आहे. दिव्यांग मतदारांच्या बाबतीत मतदाराचे अपंगत्व ४० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, असा सक्षम प्राधिकारी यांचा दाखला असणे आवश्यक आहे. मतदान केंद्रनिहाय अशा मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत नमुना १२ ड चे वाटप घरोघरी करण्यात येत आहे.

या नमुन्यामध्ये अर्ज करणाऱ्या मतदाराला त्यांच्या घरी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. नमुना १२ ड मध्ये आवश्यक सर्व माहिती भरून ती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत आचार संहिता घोषित झाल्यापासून हा फॉर्म १२ ड चे वितरण सुरू आहे. १७ एप्रिलपर्यंत तो संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करावा. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या कालावधीत हा नमुना १२ ड मधील अर्ज स्वीकारण्यासाठी या मतदारांना घरोघरी भेट देत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in