शास्त्रीय संगीताचे स्वर विरले; ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे शनिवारी पहाटे पुण्यात राहत्या घरी निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या.
शास्त्रीय संगीताचे स्वर विरले; ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन

पुणे : किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे शनिवारी पहाटे पुण्यात राहत्या घरी निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारांसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांची प्राणज्योत मावळली. प्रभा अत्रे यांचे नातेवाईक अमेरिकेत असल्याने ते भारतात आल्यावरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

१३ सप्टेंबर १९३२ रोजी पुण्यात जन्मलेल्या डॉ. प्रभा अत्रे यांनी भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विजय करंदीकर, सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. त्यांनी पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. तर संगीतामध्ये डॉक्टरेट मिळवली. काही वर्षे त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये कामही केलं. मुंबईतील नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात त्यांनी संगीतशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून काम पाहिले. गाण्याबरोबरच त्यांनी नृत्याचंही प्रशिक्षण घेतलं होतं.

त्यांना १९९० साली पद्मश्री तर २००२ साली पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तसेच संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. अत्रे यांनी संगीत या विषयावर ११ पुस्तके लिहिली आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांनी डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनची स्थापना केली होती. तसेच शास्त्रीय संगीताच्या अध्यापनासाठी त्यांनी स्वरमयी गुरुकुल या संस्थेची स्थापना केली होती. त्यांना १९९० साली पद्मश्री तर २००२ साली पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तसेच संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. अत्रे यांनी संगीत या विषयावर ११ पुस्तके लिहिली आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांनी डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनची स्थापना केली होती. तसेच शास्त्रीय संगीताच्या अध्यापनासाठी त्यांनी स्वरमयी गुरुकुल या संस्थेची स्थापना केली होती.

किराणा प्रभावळीत बहरलेला मोगरा

सततच्या आजारपणात काहीसा दिलासा मिळावा म्हणून कुणीतरी इंदिरा बाईंना सुचविलेला संवादिनी(पेटी) शिकण्याचा संगीतोपचार त्यांनी लवकरच बंद केला. आता नुकत्याच नेमलेल्या गायन मास्तरांची शिकवणी लगेच बंद कशी करायची? म्हणून वडिलांनी त्यांना, आठ वर्ष वयाच्या कन्येला शिकवणी द्यायला सांगितली. शास्त्रीय संगीत विश्वासाठी हा सुवर्णकांचन योग ठरला. कारण या घटने मुळे पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय घरात, संगीताचा पूर्वापार नसलेला संस्कार असा रुजला, बहरला, डवरला की त्याच्या वर्णनासाठी थेट माऊलींच्या शब्दांनाच शरण जावं लागेल…इवलेसे रोप लावियले द्वारी तयाचा वेलु गेला गगनावेरी"(गगनापर्यंत) मोगरा फुलला...मोगरा फुलला...पांढऱ्या शुभ्र दळदार मोगाऱ्याच्या फुलांचा सुवास जसा आपल्या सुवासानी वातावरणात पवित्रता त्यांना १९९० साली पद्मश्री तर २००२ साली पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तसेच संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. अत्रे यांनी संगीत या विषयावर ११ पुस्तके लिहिली आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांनी डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनची स्थापना केली होती. तसेच शास्त्रीय संगीताच्या अध्यापनासाठी त्यांनी स्वरमयी गुरुकुल या संस्थेची स्थापना केली होती. भरून टाकतो तद्वतच या छोट्या मुलीच्या प्रभेनं संगीताचं अवघं अवकाश उजळून निघालं. ह्या छोट्या मुलीनं पुढे आपल्या चतुरस्र प्रतिभेची प्रसन्न प्रभा शास्त्रीय गान अवकाशात पसरवून किराणा घराण्याच्या प्रभावळीत डॉक्टर प्रभा अत्रे म्हणून आपलं सात्विक अढळ स्थान निर्माण केलं.

नदीचं उगमस्थान लहानश्या झऱ्याच्या रूपात असतं मात्र पुढे ती जशी विस्तीर्ण पात्रात बदलते तसच काहीसं प्रभा ताईंच्या संगीत सरीते बद्दल म्हणता येईल. त्यांच्या घरात कधी कुणी शास्त्रीय संगीत, गाणं तर सोडाच, ऐकलं ही नव्हतं. त्यामुळे संगीतात करिअर वगैरे करण्याचं प्रभा आणि उषा या भगिनींनी ठरवण्याचा प्रश्नच नव्हता.

मात्र आठव्या वर्षी रुजलेल्या संगीत बीजा मुळे, विज्ञान आणि विधी शाखेच्या विद्यार्थिनी असलेल्या प्रभा ताई सुरांच्या शास्त्रात आणि संगीताच्या कायद्यात अधिक रममाण झाल्या. विजय करंदीकर यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीत विधिवत शिकायला सुरुवात केली. पुढे गुरू-शिष्य परंपरे नुसार किराणा घराण्याचे गायक सुरेशबाबू माने आणि त्यांच्या भगिनी हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेतलं. नमनाला घडाभर तेल या धर्तीवर सुरेशबाबुंकडे नमनालाच वर्षभर यमन गिरवून झाल्या नंतर जेव्हा प्रभा ताईंनी त्यांना विचारलं की "आणखी किती दिवस यमन शिकायचा? तेव्हा सुरेशबाबुंनी त्यांना प्रतिप्रश्न केला. तुला यमन येतो? आणि वर्षभर नियमानं यमनाचा रियाज करूनही या प्रश्नाला होकारार्थी उत्तर न देणं यातच प्रभा ताईंच्या सांगितिक जीवनाच्या यशस्वीतेच मर्म दडलं असावं.

मुलीनं डॉक्टर व्हावं अशी आई वडिलांची इच्छा होती. संगीतातल्या सरगमवर शोध प्रबंध लिहून, डॉक्टरेट मिळवून एका वेगळ्या अर्थानं प्रभा ताईंनी ती पूर्ण केली. सरगम हा तसाही प्रभा ताईंचा विक पॉइंट आहे आणि त्यांनी गायलेली सरगम हा आपण रसिकांचा. सरगम म्हणजे निव्वळ आराखडा असतो. त्याने भाव विलोप होतो अश्या प्रकारची टीका काही वेळा, काही जणां कडून होत असते. मात्र त्याने जराही विचलित न होता, ज्यांना सरगम म्हणता येत नाही ते टीका करतात असं स्पष्ट आणि ठाम मत, कुठलाही अभिनिवेश न बाळगता एका सुसंवादा दरम्यान प्रभा ताईंनी सौम्यपणे व्यक्त केलं आहे. सरगम ही सौंदर्यपूर्ण सादरीकरण पद्धत असल्याचं सांगत स्वतःच्या गायकीनं त्यांनी ते सप्रमाण सिद्धही केलं आहे. एखाद्या नाजूक फुलपाखरानं जस हळुवारपणे विविध फुलांवर विचरण करीत मधुपान करावं तशी प्रभाताईंची सरगम येते. रसिक श्रोत्यांसाठी ती एक सप्तरंगी पर्वणीच असते.

शास्त्रीय संगीताचा अजिबात गंध नसलेल्या माझ्या सारख्या अ'सूरा'ला प्रभा ताईंची मारुबिहाग, कलावती राग असलेली एचएमव्ही नं काढलेली त्यांची पहिलीच लाँग प्ले ध्वनिमुद्रिका आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या राज कल्याण आणि मधुकंस रागाच्या रेकॉर्डसनी, तानसेन जरी नाही तरी कानसेन घडवण्यात बहुमोल कामगिरी बजावली.

यांच्यामुळे शास्त्रीय संगीतातील शास्त्राशी जरी अद्यापही फार जुळून आलं नसलं, तरी संगीताशी मात्र अधिक रसपूर्ण जवळीक साधली गेली. मला शास्त्रीय संगीतानुकुल करणाऱ्या प्रभाताईंची ही ध्वनीमुद्रिका, शास्त्रीय संगीताशी ओळख असलेल्या बहुतेक सर्वांना माहीत आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये. पुढच्या ध्वनीमुद्रिका यायला मात्र बराच काळ गेला. कारण चांगला गायक हा चांगला व्यावसायिक असतोच असं नाही. मी जरी चांगली गायिका असले तरी चांगली व्यावसायिक होऊ शकले नाही. त्यामुळे ज्या ज्या वेळी ध्वनिमुद्रिकां बाबत विचारणा होत असे त्या त्या वेळी अधिक रियाज करून गाऊ या भूमिकेतून चाल ढकल करत गेले. ही माझी फार मोठी चूक ठरली" अशी खंतही प्रभा ताई प्रांजळपणे व्यक्त करतात. त्यांच्या पहिल्या ध्वनिमुद्रिकेतल्या ख्याल गायनावर किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक उस्ताद अमीर खान यांचा प्रभाव जाणवतो आणि अमीर खान साहेबांची ललत आणि मेघ राग असलेली ध्वनिमुद्रिका ही आमच्या संगीत सफरीतला पुढचा टप्पा होता. हा आणखी एक योगायोग.

प्रभा ताई या किराणा घराण्याच्या आजच्या दिग्गज गायिका असल्या तरी घराण्याचा दुराग्रही अभिमान त्यांनी मोडीत काढला. नवे विचार, प्रवाह यांचं खुलेपणानं स्वागत केलं. त्यामुळे त्यांना काहीवेळा काहींनी बंडखोर वगैरे विशेषणं चिकटवल्याच वाचनात आलं आहे. घराण्याची चौकट त्यांनी ओलांडली असेलही मात्र ती मोडली नाही. एखाद्या व्यक्तीला जसं व्यक्तिमत्व असतं तसं शब्दाला ही शब्दमत्व(?) असतं. त्यामुळे बंडखोर हे विशेषण त्यांच्या सारख्या सात्विक, सोज्वळ, मृदू गायिकेच्या बाबतीत वर्ज्य ठरतं. त्या ऐवजी क्रांतिकारी, सुधारक, पूनर्भाष्य कर्ती असे शब्द अधिक योग्य ठरतील. "घराण्याच्या उज्वल परंपरांचं जतन करत असतांनाच, त्याचा परीघ विस्तार करण्यात काय चुकीचं आहे? घराणं जिवंत ठेवण्यासाठी त्यात निरंतर नाविण्याची पखरण करून गायकी अधिक मोहक, सशक्त करणं ही प्रत्येक कलाकाराची जबाबदारी आहे. संथ आलापी, स्वर माधुर्य, भावपूर्ण प्रस्तुती या किराणा घराण्याच्या विषेशांगांना जराही धक्का न लावता तार्किक आणि वैज्ञानिकतेची जोड दिल्यामुळे गाणं हे पठडीतलं राहिलं नाही असं त्यांनी स्वतःच म्हटलं आहे. जो संगीत शिकतो त्याला सर्व कलांच थोडंफार तरी ज्ञान असलं पाहिजे हे त्यांचं मत स्वतःच्या आचरणातून ठसवून दिलं. किराणा घराण्याच्या मानधन्य शास्त्रीय संगीत गायिका तर त्या आहेतच पण त्याचबरोबर त्यांनी कथक या भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारचा ही पदांन्यास केलेला आहे. भरतनाट्यम नृत्यांगना सुचेता भिडे चापेकर यांनी कोरियोग्राफ केलेल्या 'नृत्य प्रभा' या नृत्य कार्यक्रमासाठी हिंदी संगीत रचनाही केली आहे. मानापमान, सौभद्र, संशय कल्लोळ, विद्याहरण,संगीत मृच्छकटिक, बिरज बहू, लिलाव आदी नाटकात भूमिका करून त्यांनी काही काळ मराठी संगीत रंगभूमी सुशोभित केली. ख्याल गायकी बरोबरच ठुमरी, दादरा, नाट्यगीत, भजन, गझल गायकीही लालित्यपूर्ण रीतीनं मोठ्या सिद्धतेने कंठाळली आहे. (साहित्यातले विविध प्रकार लेखक/लेखिका हाताळतो/हाताळते मग गायकीतले विविध प्रकार गायक/गायिका कंठाळतो/कंठाळते असं का म्हणू नये ?) त्यांच्या ठुमरी गायनावर बडे गुलाम अली खान यांची सुखद सावली आहे. उत्तर भारतात विशेषतः पंजाबी गायकीत अधिक प्रचलित असलेला टप्पा किराणा घराण्यात प्रथम प्रभा ताईंनीच आणला. त्याच बरोबर दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत असे बहुविध संगीत प्रकार त्या लालित्यानं गातात. भारतीय शास्त्रीय संगीताच्या जगभरात झालेल्या प्रसारात त्यांचा मोलाचा वाटा आहे. प्रभा ताई म्हणजे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या किराणा घराण्याच्या प्रभावळीत बहरलेली प्रसन्न मोगऱ्याची जणू वेली आहेत. त्यांची स्वरनिष्ठा आणि सर्जनशीलता वाखाणण्याजोगी आहे. अनुसरणिय आहे. पूर्व कल्याण, दरबारी कौन्स, पटदीप-मल्हार, शिव काली, तिलंग-भैरव, रवि भैरव सारख्या मिश्र रागांची निर्मिती करून त्यांनी संगीत सरितेचं पात्र अधिक विस्तारलं. कला सादरीकरण हा गायकाचा प्रांत तर बंदिशी बांधण्याची कामगिरी ही नायकाची जबाबदारी मानली जाते. या निकषावर प्रभा ताई या गायक नायक ठरतात. गायिका तर त्या आहेतच पण अनेक बंदिशींची ही त्यांनी रचना केली. सुस्वराली हा त्यांचा बंदिशींचा आणि अंतःस्वर हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. आणि म्हणूनच प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभाताईंचा बहुआयामी लौकिक आहे. प्रभा ताईंनी विज्ञान आणि विधी या दोन्ही शाखांच शिक्षण घेतलं असलं तरी बेडूक, झुरळं यांचं विच्छेदन करणं किंवा अशिलां साठी युक्तीवाद करणं हे त्यांच्या स्वभाव धर्माशी सुसंगत नव्हतं. म्हणून प्रथमतः त्यांनी आकाशवाणीवर निर्माती म्हणून काम सुरू केलं. तिथे त्यांनी कर्नाटक, पाश्चात्य, सुगम , चित्रपट असं सर्व प्रकारचं संगीत, कुठलाही उच्च नीच असा भेदभाव न बाळगता खुल्या कानांनी ऐकलं. तिथेच त्यांनी अमिर खाँ यांचं गाणं ही खूप ऐकलं आणि त्यांची वैचारिक बैठक आकारत गेली.

तसच ठुमरी वरचा बडे गुलाम अली खाँ, बेगम अख्तर, नूरजहाँ यांचा प्रभाव अत्यंत प्रांजळपणे मोठ्या मनानं त्या मान्य करतात. संगीत कला कठीण आहे. "सुरांची साधना पाण्यावर ओढलेल्या रेषे सारखी उमटत असताच मिटून जाणारी" ही त्यांच्याच कवितेची ओळ फारच समर्पक आहे. त्यांच एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कलात्मकता आणि शास्त्रीयता या दोन्हीत त्यांनी साधलेला समतोल. एकीकडे घराण्याची शिस्त पाळली मात्र घराण्याचा पारंपरिक उंबरठा त्यांनी ओलांडला आणि शास्त्रीय संगीताची बैठक (base) अधोरेखित करत असतानाच सुगम संगीताला ही कधी कमी लेखलं नाही. सुगम संगीत हे शब्द प्रधान आहे. शब्दांचे अर्थ आपण जाणतो. इथे सूर आपल्या पर्यंत पोहोचतात ते शब्दांच्या, शब्दार्थाच्या माध्यमातून. पण शास्त्रीय संगीतात जो पर्यंत राग, ताल, नियम हे जाणत नाही तो पर्यंत खऱ्या अर्थानं त्याचा आनंद घेता येत नाही हा या दोन प्रकारात फरक आहे. सुगम संगीत हे ऐकायला जरी सुगम असलं तरी ते प्रभावी गाता येणं मात्र तितकच अवघड आहे. त्यासाठी शास्त्रीय संगीतासाठी जेव्हढा अभ्यास, साधना करावी लागते तितकीच किंबहुना अधिक मेहनत घ्यावी लागते.

शास्त्रीय संगीतातल्या बंदिशी म्हणजे खरं काव्य नव्हे. कारण तिथे शब्द हे संगीत सामग्रीच्या रूपात येतात पण सुगम संगीतात काव्य हे घरातल्या कर्त्या प्रमाणे असतं. त्यामुळे ते एका विशिष्ट दर्जाचं असणं अभिप्रेत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in