समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच ; भरधाव खासगी बसची ट्रकला धडक, २० प्रवासी जखमी

ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सावंगी परिसरात घडली असून या अपघाता जखमी झालेल्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच ; भरधाव खासगी बसची ट्रकला धडक, २० प्रवासी जखमी
Published on

समृद्धी महामार्ग आणि अपघात हे जणू समिकरणच झालं आहे. समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्स अपघाताची घटना ताजी असताना, आता पुन्हा या महामार्गावर एक अपघात झाला आला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या एका खासगी ट्रव्हल्सने एका ट्रक मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला असल्याचं सांगितलं जात आहे. या अपघात २० प्रवासी जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सावंगी परिसरात घडली असून या अपघाता जखमी झालेल्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

खुराणा ट्रॅव्हल्सची खासगी बस प्रवाशांना घेऊन निघाली होती. ही बस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सावंगी परिसरात आली असता, एका लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या ट्रकला बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की यात बसच्या कॅबिनचा चक्काचूर झाला. या अपघाताती माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केलं. या अपघातात जखमी झालेल्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी एका खासगी ट्रॅव्हच्या झालेल्या अपघातात २५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. यानंतर या महामार्गावर तसंच खासगी स्लिपर ट्रॅव्हल्सवर मोठी टीका होऊ लागली होती. तसंच खासगी बसच्या प्रवास सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उभे राहीले होते.

logo
marathi.freepressjournal.in