सीरम इन्सि्टट्यूट आणणार ओमायक्रॉनवर लस

पुनावाला म्हणाले की, “आमची कंपनी ओमायक्रॉनवर प्रभावी लसीच्या निर्मितीसाठी नोव्हावॅक्ससोबत काम करत आहे
सीरम इन्सि्टट्यूट आणणार ओमायक्रॉनवर लस

कोरोनाचा प्रकोप कमी व्हायला तयार नाही. त्याचे वेगवेगळे व्हेरिएंट येत आहेत. त्यातील सर्वाधिक संसर्ग करणाऱ्या ओमायक्रॉनवर लस तयार करण्याची घोषणा सीरम इन्सि्टट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख आदर पुनावाला यांनी केली.

पुनावाला म्हणाले की, “आमची कंपनी ओमायक्रॉनवर प्रभावी लसीच्या निर्मितीसाठी नोव्हावॅक्ससोबत काम करत आहे. ही लस ओमायक्रॉनच्या बीए-५ या सब-व्हेरिएंटसाठी असेल. आम्ही येत्या सहा महिन्यांत लस बाजारात आणू.

याव्यतिरिक्त, भारत बायोटेकची कोविड-१९च्या बीबीव्ही-१५४ इंट्रानेजल लसीची तिसरी क्लिनिकल चाचणी पूर्ण झाली आहे. कंपनीने लसीचा डेटा औषध नियामकाकडे सादर केला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या चाचण्यांमध्ये ही लस सुरक्षित आणि इम्युनोजेनिक असल्याचे सिद्ध झाले आहे. ही लस बूस्टर डोस म्हणून दिली जाऊ शकते.

भारत बायोटेकने सांगितले की, पहिल्या आणि दुसऱ्या चाचण्यांमध्ये, ही नेजल व्हॅक्सिन सुरक्षित, वेल टॉलरेटेड आणि इम्युनोजेनिक असल्याचे सिद्ध झाले आहे. ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांच्यावर बूस्टर डोस म्हणून याची ट्रायल घेण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in