मुंबई : सेवा विकास सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या कर्ज घोटाळा प्रकरणात पुणे येथील रोझरी एज्युकेशन ग्रुपचे भागीदार विनय अरान्हाला विशेष पीएमएलए न्यायालयाने झटका दिला. न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.
सेवा विकास सहकारी बँकेच्या ४२९ कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अरान्हाला अटक केली. तुरुंगात असलेल्या विनय अरान्हाने जामीनासाठी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी ४ एप्रिलला सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. हा निर्णय मंगळवारी जाहीर करताना न्यायालयाने अरान्हाला झटका दिला.
अरान्हाने बनावट कागदपत्रांचा वापर करून पुणे येथील कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज मिळवल्याचा आहे. एकूण ४२९ कोटी रुपयांच्या आर्थिक अफरातफरीमध्ये अरान्हाचा सहभाग असल्याचा ईडीचा आरोप आहे.