किरीट सोमय्या यांच्यासाठी शहाजीबापूंचे परमेश्वराला साकडं ; म्हणाले, "किरीट सोमय्या यांची व्हिडिओ क्लिप..."

अंबादास दानवे यांनी याप्रकरणाचे आठ तासांचे व्हिडिओ फुटेज विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे जमा केलं आहे
किरीट सोमय्या यांच्यासाठी शहाजीबापूंचे परमेश्वराला साकडं ; म्हणाले, "किरीट सोमय्या यांची व्हिडिओ क्लिप..."

भाजप नेते आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. या व्हायरल व्हिडिओप्रकरणी विरोधकांनी सत्ताधारी भाजपासह किरीट सोमय्या यांना धारेवर धरलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याप्रकरणाचे आठ तासांचे व्हिडिओ फुटेज विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे जमा केलं आहे. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी देखील सोमय्या यांची सुरक्षा काढण्याची मागणी केली आहे.

व्हायरल व्हिडिओ प्रकरणी विरोधकांकडून टीका केली जात असताना सत्ताधारी पक्षाचे आमदार शहाजीबाहू पाटील यांनी मात्र किरीट सोमय्या यांच्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली आहे. किरीट सोमय्या यांच्या संबंधिचा व्हायरल व्हिडिओ हा खोटा किंवा बनावट निघावा, अशी विनंती शहाजीबापू यांनी देवाला केली आहे. प्रासारमाध्यामांशी बोलताना त्यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे.

व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, "सरपंचापासून ते अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत कोणताही लोकप्रतीनीधी असला तरी त्याने नैतिकतेनं वागणं ही राजकारणातील जबाबदारी आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांची व्हिडिओ क्लिप खोटी आणि बनावट निघावी, अशी मी परमेश्वराकडे विनंती करतो", असं शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, मराठी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्तदिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी याप्रकरणावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित केली आहे. यात त्यांनी संबंधित व्हिडिओची सत्यता तपासावी आणि चौकशी करावी. मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही. असं म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in