Nashik : शालार्थ आयडी घोटाळा; संजय गरुड याला अटक

महाराष्ट्रातील बहुचर्चित 'शालार्थ आयडी' घोटाळाप्रकरणी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत जळगाव जिल्ह्यातील भाजपशी संबंधित शिक्षण संस्थाचालक संजय गरुड याला सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथून अटक केली आहे.
शालार्थ आयडी घोटाळा; संजय गरुड याला अटक
शालार्थ आयडी घोटाळा; संजय गरुड याला अटक
Published on

मुंबई/नाशिक: महाराष्ट्रातील बहुचर्चित 'शालार्थ आयडी' घोटाळाप्रकरणी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत जळगाव जिल्ह्यातील भाजपशी संबंधित शिक्षण संस्थाचालक संजय गरुड याला सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथून अटक केली आहे. बनावट शिक्षकांचे आयडी तयार करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी पगार स्वरूपात लाटल्याचा आरोप त्याच्यावर आहे. संजय गरुड हा जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात अनेक शिक्षण संस्था चालवतो.

जानेवारी २०२४ मध्ये त्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. एसआयटी या घोटाळ्याचा सखोल तपास करत आहे. हा एक मोठा घोटाळा असून, यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांचा खरा चेहरा लवकरच समोर येईल, असे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in