जब शनि महाराज की लाठी चलती है तो...शनिशिंगणापूर संस्थानचं विशेष ऑडिट होणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

65 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना 1800 कर्मचारी देवस्थानमध्ये काम करत असून केवळ 12 कर्मचारीच कामावर येतात...
जब शनि महाराज की लाठी चलती है तो...शनिशिंगणापूर संस्थानचं विशेष ऑडिट होणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थानमधील कथित घोटाळ्याची चौकशी करण्याची आणि विशेष ऑडिट करण्याची, घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानपरिषदेत केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या लक्षवेधीनंतर फडणवीसांनी ही घोषणा केली. "जब शनि महाराज की लाठी चलती है तो आवाज नहीं होता," असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

शनिशिंगणापूर देवस्थानातील घोटाळ्याचा मुद्दा विधान परिषदेत गाजला. यात विश्वस्तांमार्फत मोठा भ्रष्ट्राचार झाला असून कर्मचारी भरतीत मोठा घोटाळा आहे, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. 65 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना 1800 कर्मचारी देवस्थानमध्ये काम करत असून केवळ 12 कर्मचारीच कामावर येतात आणि बाकीच्यांना घरबसल्या पगार मिळत असल्याचा मुद्दा बावनकुळे यांनी मांडला होता.

"विश्वस्त मंडळाच्या नोकर भरती, देणगी स्वीकारण्याची पद्धत, इत्यादीबाबत सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. चौकशीनंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल," असे फडणवीस यांनी सांगितले. श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त अधिनियम २०१८ ची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर तो लागू करण्यात येईल, शनैश्वर देवस्थानचे विशेष लेखापरीक्षणनंतर उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in