शरद पवारांनी रायगडावरून फुंकली 'तुतारी', म्हणाले - "रणशिंग फुंकायला..."

जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनीही तुतारी फुंकून आगामी होणाऱ्या निवडणुकांसाठी रणशिंग फुकलं.
Sharad Pawar At Raigad Fort
Sharad Pawar At Raigad Fort

महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल, तर पुन्हा एकदा जनतेचं राज्य आलं पाहिजे. निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा मिळेल, अशी ही तुतारी आहे. तुतारी हे राज्याचं ऐतिहासिक वाद्य आहे, त्यामुळे आपल्याला ऐतिहासिक चिन्ह मिळालं आहे, असं म्हणत पवार यांनी रायगडावर तुतारी चिन्हाचं अनावरण करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या - शरदच्रंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. दरम्यान, किल्ले रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं शरद पवार गटाने (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) तुतारी चिन्हाचं अनावरण केलं. विशेष म्हणजे शरद पवार यांना डोलीतून रायगडावर नेण्यात आलं. यावेळी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनीही 'तुतारी' फुंकून आगामी होणाऱ्या निवडणुकांसाठी रणशिंग फुकलं.

रायगडावरून पवार म्हणाले, देशामध्ये वेगळी स्थिती आहे. सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे. सर्वांच्या हाताला काम नाही. सर्व सामान्य माणसाला कुटुंब चालवणं कठीण झालं आहे. देशात असलेली राजकीय पक्षांची सत्ता सामान्य माणसांच्या हिताची नाही. हा एक वैचारिक संघर्ष आहे. सामान्य माणसाचं आत्मविश्वास वाढवण्यासाठी ऐतिहासिक चळवळ झाली. या देशात अनेक राजे झाले. संस्थानिक झाले पण रयतेचा राजा एकच झाला. आजचा हा दिवस आपल्यासाठी अखंड राहील, असा हा दिवस आहे.

ते पुढे म्हणाले, देशामध्ये वेगळी स्थिती आहे. सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे. सर्वांच्या हाताला काम नाही. सर्व सामान्य माणसाला कुटुंब चालवणं कठीण झालं आहे. देशात असलेली राजकीय पक्षांची सत्ता सामान्य माणसांच्या हिताची नाही. हा एक वैचारिक संघर्ष आहे. सामान्य माणसाचं आत्मविश्वास वाढवण्यासाठी ऐतिहासिक चळवळ झाली. या देशात अनेक राजे झाले. संस्थानिक झाले पण रयतेचा राजा एकच झाला. देशात अडचणी वाढत चालल्या आहेत. शिवछत्रपतींचे राज्य सामान्य लोकांची सेवा करणारं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार गटाला तुतारी चिन्ह बहाल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नुकतेच दिले होते. लोकसभा निवडणुकीसाठी तुतारी चिन्ह वापरता येणार असल्याने किल्ले रायगडावर शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा भरवण्यात आला होता. यावेळी तुतारी चिन्हाचे शरद पवार यांच्याहस्ते अनावरणही करण्यात आले. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांनीही उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in