'एक देश, एक निवडणुकी'वरून शरद पवारांचा मोदींना टोला

पंतप्रधान मोदी जे बोलतात त्यामध्ये सत्य नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
शरद पवार
शरद पवार
Published on

मुंबई : स्वातंत्र्यदिनी देशाला

उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक देश, एक निवडणूक मुद्दा मांडला, असे असताना केवळ दोन राज्यांचे निवडणुकीचे वेळापत्रकच का जाहीर करण्यात आले, निवडणुकांचे एकत्रित वेळापत्रक का जाहीर करण्यात आले नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार यांनी शनिवारी नागपूर येथे केला. पंतप्रधान मोदी जे बोलतात त्यामध्ये सत्य नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

जम्मू-काश्मीर हरयाणातील निवडणुकीचे निवडणूक आयोगाने जाहीर आणि विधानसभा वेळापत्रक शुक्रवारी केले. जम्मू- काश्मीरमधील सुरक्षेचे कारण देत आयोगाने निवडणुकीचे महाराष्ट्रातील वेळापत्रक कालांतराने जाहीर करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले.

हा प्रकार समाज हिताचा नाही ! रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यामुळे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे तणाव निर्माण झाला त्याबद्दल विचारले असता पवार म्हणाले की, हा प्रकार समाजाच्या हिताचा नाही. आज शांततेची गरज आहे याची समाज आणि राजकीय नेत्यांनी जाणीव ठेवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले

logo
marathi.freepressjournal.in