शरद पवार 'सह्याद्री' अतिथीगृहात दाखल; मुख्यमंत्री शिंदेंशी मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर करणार चर्चा

शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाले आहेत.
शरद पवार 'सह्याद्री' अतिथीगृहात दाखल; मुख्यमंत्री शिंदेंशी मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर करणार चर्चा
Published on

शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणासह राज्यातील विविध विषयांवर शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करू शकतात. दरम्यान काल पुण्यात झालेल्या भाजप मेळाव्यात गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली होती. आता त्याच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत.

शरद पवार 'वर्षा'वर पोहोचले...

एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची ही भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा या बंगल्यावर ही भेट होत आहे. शरद पवार आज दुपारी दीड वाजता त्यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानाहून निघाले. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थान पोहोचले. या भेटीमध्ये खासकरून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते. याशिवाय राज्यातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांवरही शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा होऊ शकते.

छगन भुजबळांनी शरद पवारांना केली होती विनंती...

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगेंनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं, अशी मागणी केली आहे. त्याचवेळी ओबीसी समाजानं जरांगेच्या मागणीला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर आठवडाभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नामध्ये लक्ष घालवं, अशी विनंती त्यांनी केली होती.

logo
marathi.freepressjournal.in