पक्ष फोडणाऱ्यांना योग्य जागा दाखवू! शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना इशारा

या सामुदायिक शक्तीच्या जोरावर आम्ही नक्कीच निवडणुकीत यश संपादन करू. काही लोक सध्या दमदाटी करत आहेत. पण या दमदाटीला घाबरणारी ही अवलाद नाही, असेही शरद पवार म्हणाले.
पक्ष फोडणाऱ्यांना योग्य जागा दाखवू! शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना इशारा

मुंबई : पक्ष फोडणाऱ्यांना योग्य जागा दाखवू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. बारामती मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेळाव्यात त्यांनी हा इशारा दिला.

फडणवीस यांनी त्यांच्या एका भाषणात उल्लेख केला होता की, मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो. गेल्या काही महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष फुटले. त्यासंदर्भात पवार यांनी म्हटले की, दोन पक्ष फोडले म्हणणाऱ्यांना हे माहीत नाही की त्या पक्षाचे हजारो, लाखो कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे लाखो चिवट कार्यकर्ते आगामी लोकसभा निवडणुकीत पक्ष फोडणाऱ्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.

या सामुदायिक शक्तीच्या जोरावर आम्ही नक्कीच निवडणुकीत यश संपादन करू. काही लोक सध्या दमदाटी करत आहेत. पण या दमदाटीला घाबरणारी ही अवलाद नाही, असेही पवार म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in