
राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणुका होतील, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार टिकणार की नाही, हे स्पष्ट होईल. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे.
हे सरकार कोसळेल, अशी विधाने शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून वारंवार होत आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळे मत व्यक्त केले आहे. पत्रकार परिषदे दरम्यान पवारांना शिंदे-फडणवीस सरकारच्या अस्थिरतेबाबत विचारले असता ते म्हणाले, सरकार पडेल की नाही हे सांगणारा मी ज्योतिषी नाही. माझा विश्वास नाही. मी कुठेही हात दाखवायला जात नाही. महाराष्ट्रात असे कधीच घडले नव्हते. ठाकरे गटनेत्यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना ते म्हणाले की, मध्यावधी निवडणुका होतील की नाही हे सांगण्याच्या मनस्थितीत मी नाही.